Assembly Election : बैठकांचा सपाटा, 10 ते 15 दिवसांत मोठी घोषणा होणार, मोठ्या नेत्यांनी दिले संकेत

Assembly Election MVA Mahayuti : महाविकास आघाडीत उद्यापासून पुढील तीन दिवस जागावाटपासंदर्भात बैठका होणार असल्याची माहिती आहे तर, पुढील दोन दिवसानंतर महायुतीमध्ये देखील जागा वाटपासंदर्भात बैठका होणार आहेत.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVASarkarnama
Published on
Updated on

Assembly Election : गणेशविसर्जनानंतर सर्वच राजकीय पक्ष अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होईल, असे संकेत दिले होते. त्यानंतर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी देखील पुढील 10 ते 15 दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे भाकीत केले आहे.

निवडणुकीच्या तयारीसाठी तसेच जागावाटपाच्या चर्चेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांचा सपाटा लावण्यात येतो आहे.

महाविकास आघाडीत उद्यापासून पुढील तीन दिवस जागावाटपासंदर्भात बैठका होणार असल्याची माहिती आहे तर, पुढील दोन दिवसानंतर महायुतीमध्ये देखील जागा वाटपासंदर्भात बैठका होणार आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारीची यादीतील नावे निश्चित करण्यात येत आहेत. ती प्रक्रिया पुढील 15 दिवसांत पार पडले. आणि पितृपंधरवडा संपल्यानंतर काही उमेदवाऱ्यांच्या नावाची घोषणा वर्तवली जात आहे.

Mahayuti Vs MVA
Rahul Gandhi : प्रक्षोभक विधानांचा 'सिलसिला'; कोणाला फटका बसणार?

10 ते 15 नोव्हेंबरला मतदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळ 10 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रि‍पदासाठी रस्सीखेच

महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरवले जाणार असल्याचे संकेत देखील फडणवीस यांनी दिले होते.तर महाविकास आघाडीत देखील उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केल्यानंतर देखील काँग्रेस, शरद पवार गटाकडून निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रि‍पदावर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Mahayuti Vs MVA
Ajit Pawar : "अजितदादांनी थांबवलं तरी, भाजपच्या आमदाराविरोधात लढणार", 'NCP'तील नेत्या इरेला पेटल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com