Raj-Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीबाबत भाजपच्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, 'एकत्र येणे...'

BJP leader statement News : मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विजयी मेळावा घेतला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच याबाबत भाजपच्या बड्या नेत्याने मोठे विधान केले आहे.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूची राजकीय युती होणार की नाही यावरून मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येत मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विजयी मेळावा घेतला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच याबाबत भाजपच्या बड्या नेत्याने मोठे विधान केले आहे.

पहिलीपासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका घेत त्या याविरोधात मनसेकडून मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने देखील या आंदोलनात उडी घेतली. त्यानंतर राज्यातून विरोध वाढत असल्यामुळे महायुती सरकारने काढलेले दोन्ही जीआर मागे घेतले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Pratap Sarnaik : माझ्याशी हिंदीत नाही तर मराठीतच बोला; आयएएस अधिकाऱ्यांना सरनाईकांनी ठणकावले

राज्य सरकारने जीआर मागे घेतल्यानंतर पाच जुलै रोजी मुंबई विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधुंची उपस्थिती होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यावर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

राजकारणात येत्या काळात कोणीही एकत्र आले तर आम्हाला काही पोटसुळ व्हायचे कारण नाही. पण मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल, असे वाटत नाही. उद्धव ठाकरे हे त्यांची विचारसरणी सोडून काँग्रेससोबत गेले. बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटपर्यंत काँग्रेसला विरोध केला, त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करतील, असे वाटत नाही. ठाकरे बंधूंची युती झाली तरी भाजपला काही फरक पडणार नाही, असेही दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
BJP internal conflict : बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे, पडळकरांना वॉर्निंग; प्रदेशाध्यक्षांनी तंबी दिल्याने चाप बसणार का?

ठाकरे ब्रँड हा बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड होता. त्यानंतर काँग्रेस बरोबर गेल्यावर बँड कसा वाजला हे महाराष्ट्राने बघितले आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा हिंदुत्ववादी ब्रँड एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे यांना 20 वर्षे राज ठाकरेंची आठवण झाली नाही.आता मजबुरी म्हणून राज ठाकरे यांच्यासाठी पायघड्या घालत आहेत, पण 20 वर्षे राज ठाकरे यांनी हात पुढे केला असताना त्यांनी दिला नाही, अशी टीका यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Solapur NCP Dispute : उमेश पाटलांना शह देण्यासाठी राजन पाटलांची सोलापूर शहरातून मोठी खेळी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com