MLC BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी तयार, दिल्लीत होणार शिक्कामोर्तब! 'या' नेत्यांना पहिली पसंती!

MLC Election BJP : भाजप उमेदवारांची संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये 30 नेत्यांची नावे आहेत. यातील सहा नावांवर दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे.
BJP leaders gather at Varsha residence to discuss Vidhan Parishad candidate selection and election strategy in Maharashtra.
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

MLC Election News : विधान परिषद निवडणुकीसाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवास्थान वर्षा बंगल्यावर भाजपची बैठक पार पडली होती. या बैठकीत भाजप उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. या सहा जागांसाठी या यादीत तब्बल 30 नावे आहेत. ही यादी दिल्लीत पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय दिल्लीतून होणार आहे. त्यामुळे संभाव्या 30 नेत्यांमधून कोणाला संधी मिळणार याची चर्चा आहे.

एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीला पाठवलेल्या यादीमध्ये प्रशांत परिचारक, राम सातपुते, सुरेश हळवणकर, निलय नाईक, प्रकाश पाटील देवसरकर, राजीव पोतदार, संजय केणेकर, सुनील कर्जतकर,प्रज्ञा सातव, राजा राऊत, विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, सुरेश बनकर, अर्चना पाटील चाकूरकर, दयाशंकर तिवारी. अनंतराव देशमुख, गणेश हाके, नीता केळकर, राजेश पांडे, डॉ. आरती फुसाटे, अतुल काळसेकर, माधव भंडारी, माधवी नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.

प्रज्ञा सातव यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित मानले जात आहे. महाराष्ट्र प्रदेशकडून तीन नावांबाबत आग्रह धरला जाऊ शकतो. तर, तीन नावे ही दिल्लीच्या पसंतीची असतील असे समजते. दरम्यान, संघटनेमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना संधी मिळणार असल्याची देखील चर्चा आहे.

आता कुठल्याही मोठ्या निवडणूका नसल्याने सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा विचार न करता संघटनेसाठी काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी देखील भाजपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

BJP leaders gather at Varsha residence to discuss Vidhan Parishad candidate selection and election strategy in Maharashtra.
MLC election : विधानपरिषदेसाठी एकनाथ शिंदेंकडून पहिले नाव फिक्स : दुसऱ्या जागेसाठी 7 जणांची चर्चा; 'वाघमारे' पॅटर्न रिपीट होणार?

मविआकडून ठाकरेच उमेदवार?

महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येत आहे. त्यातही ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार होण्यास फारसे उत्सुक नाहीत. मात्र, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेच मविआचे उमेदवार असतील असे सांगितले जात आहे.

BJP leaders gather at Varsha residence to discuss Vidhan Parishad candidate selection and election strategy in Maharashtra.
Uddhav Thackeray: मोठी बातमी! महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंची उमेदवारी फिक्स? काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पाठींबा जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com