Amit Satam : प्रसाद लाड यांच्या पाठोपाठ आणखी एका भाजप नेत्याचा मनोज जरांगेंवर निशाणा, '...नादी लागून भरकटले'

BJP Ameet Satam Criticized Manoj Jarange : इतर समाजाचा जो पाठींबा मिळत होता मात्र आपल्या वागण्या आणि बोलण्यामुळे त्यापासून कुठेतरी दुरावत चालला आहात. मात्र अजुनही वेळ गेलेली नाही, असा सल्ला अमित साटम यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
Manoj Jarange
Manoj Jarange sarkarnama
Published on
Updated on

Ameet Satam News : भाजप नेते प्रसाद लाड यांच्यानंतर आणखी एका भाजप नेत्याने मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या नादी लागून मनोज जरांगे भरकटले, असा हल्लाबोल भाजपचे मुंबईतील अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. अजून वेळ गेलेली नाही, असा सल्लाही साटम यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे.

मनोज जरांगे यांच्यात मराठा समाजाला न्याय देण्याची क्षमता आहे. पण त्यांचा पोलिटिकल गेम होत असल्याचे आमदार साटम म्हणाले आहेत.

'माननीय मनोज जरांगे पाटीलजी Manoj Jarange Patil आपण जेव्हा मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. उपोषणाला बसलात तेव्हा मला सामान्य मराठा म्हणून खूप अभिमान वाटला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे पालन करत होता. जेव्हा शिवाजी महाराज मोहिमेवर जायचे त्यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य रयत भरडली गेली नाही पाहिजे, असे आदेश त्यांचे असायाचे. पण आता शरद पवारांच्या नादी लागून आपण भरकट ले आहात', असे अमित साटम जरांगे पाटलांना म्हणाले आहेत.

Manoj Jarange
Thackeray Group Claim : ठाकरे गटाचा विधानसभेच्या 130 जागांवर दावा; सोलापुरातील मेळाव्यात शिवसेना नेत्याचे भाष्य

'इतर समाजाचा जो पाठींबा मिळत होता मात्र आपल्या वागण्या आणि बोलण्यामुळे त्यापासून कुठेतरी दुरावत चालला आहात. मात्र अजुनही वेळ गेलेली नाही. जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडावे. कारण आपल्यामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची क्षमता आहे.', असे देखील साटम म्हणाले आहेत.

'सगेसोयऱ्यांना पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे,असाच सुप्त अध्यादेश शरद पवार Sharad Pawar साहेबांचा राहिला आहे. शरद पवार साहेबांनी एखादा तरी गरीब मराठा, गरीब मराठा कुटुंबातून येणाऱ्या कुणाला मोठे केले आहे का? हे सगळं आपल्याला सांगत आहे कारण मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आपल्यात आहे. हे ते जाणतात त्यामुळे आपला पाॅलिटिकल गेम होत आहे.', असे देखील अमित साटम म्हणाले आहेत.

Manoj Jarange
Sharad Pawar NCP : दिंडोरीसाठी आघाडीत भाऊगर्दी, पण उमेदवारीचे निकष ठरले; श्रीराम शेटेंनी वाढवली इच्छुकांची धडधड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com