Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाची धग नांदेडपर्यंत; भाजप खासदारही म्हणाले, 'माझा विरोधच, मुख्यमंत्र्यांनी'

Ashok Chavan Opposes Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेला विरोधाची धग सांगलीनंतर आत नांदेडपर्यंत पोहचली आहे.
Shaktipeeth Highway-Devendra Fadnavis
Shaktipeeth Highway-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राज्य सरकारने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. पण कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला असून सरकारने प्रकल्प रेटे नये, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. असाच इशारा सांगलीत खासदार विशाल पाटील यांनी देखील दिला असतानाच महायुतीची डोकेदुखी भाजप खासदाराने वाढवली आहे.

नांदेड येथील भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी, 'आधीपासूनच या महामार्गाला आपला विरोध असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसरा मार्ग काढवा', असा सल्ला दिला आहे. हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून तो गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे.

शक्तीपीठ महामार्गाला सर्वाधिक विरोध हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार असून हजारो हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. तर वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. पण या महामार्गाला आता कोल्हापूर आणि सांगलीत मोठा विरोध सुरू झाला आहे.

दरम्यान या महामार्गाला नांदेडमध्ये देखील विरोध सुरू जाला असून शेतकऱ्यांच्या कोणत्याच हिताचा हा महामार्ग नसल्याची भावना नांदेडसह 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. अशातच आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी, शक्तीपीठाला आपला विरोध आधीपासूनच होता आणि तो आताही असल्याचे म्हटले आहे. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या असून चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून याची माहिती देऊ. तर त्यांना पर्यायी मार्ग काढण्याची विनंती करू? असे म्हटले आहे.

Shaktipeeth Highway-Devendra Fadnavis
Ashok Chavan News : नांदेडवर पकड मिळवण्यासाठी अशोक चव्हाण 'अ‍ॅक्टिव्ह'; विरोधकांच्या तंबूत शिरकाव!

मुंडे बंधू आणि भगिंनींना दूर ठेवा

तसेच चव्हाण यांनी बीडमध्ये बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून इशारा दिला आहे. त्यांनी मुंडे भाऊ आणि बहिणींना नांदेडच्या पाकलमंत्रीपदाची जबाबदारी देऊ नये असे म्हटले आहे. त्यांनी नांदेडचा बीड होऊ द्यायचा नसेल तर मुंडे बंधू आणि भगिंनींना दूर ठेवा असे म्हटले आहे. तसेच त्यांनी लोकांच्या मागण्या अनेक आहेत. मतेही वेगळी आहेत. पण शेवटी निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. ते ठरवतील तेच पालकमंत्री होतील असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

Shaktipeeth Highway-Devendra Fadnavis
Ashok Chavan News : पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री? चर्चा आहे! खासदार चव्हाण म्हणाले, तो फार मोठा विषय नाही…

राज्यव्यापी आंदोलन

वर्धा ते गोवा जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यात विरोध आहे. याचे मूळ कारण हजारो शेतकऱ्यांच्या बागायची आणि उपजत जमिनी यात जाणार आहेत. यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. यामुळे याला विरोध करण्याचे नांदेडमधील शेतकऱ्यांनी ठरवले आहे. या महामार्गाला विरोध करताना, यामुळे शेतजमिनीची नासधूस होणार असून जमिनीचा कस कमी होणार आहे. तसेच शेतकरी भूमिहीन होणार असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल असेही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. तर यामहामार्गाला विरोध करण्यासाठी 24 जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com