Chandrashekhar Bawankule: भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं 'प्रमोशन',दिल्लीतून सोपवली थेट राष्ट्रीय पातळीवरची मोठी जबाबदारी

BJP Political News: भाजपकडून आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून आगामी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळेंची सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी टीका केल्यामुळे राज्याचे महसूल मंत्री व महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चर्चेत आले होते. मात्र, याच बावनकुळे यांच्यावर आता दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी नवी आणि तीपण राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपवली आहे.

भाजपकडून आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून आगामी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळेंची सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक पातळीवर चांगली पकड मिळवली होती. तसेच त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना संपूर्ण महाराष्ट्र पायाला भिंगरी लावून पिंजून काढला होता. त्यांच्या कामाचा झपाटाही कमालीचा राहिला होता. तसेच मंत्रिमंडळातही महसूलमंत्री म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली आहे.

या सगळ्या बाबींचा सारासार विचार करुन भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रमोशन केलं आहे. त्यांना आता राज्यस्तरीय नव्हे,तर आता राष्ट्रीय पातळीवरची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संघटनात्मक सहप्रभारी नेत्यांमध्ये बावनकुळेंचा समावेश करण्यात आला आहे.

Chandrashekhar Bawankule
Dharashiv Politics: 'कैलास पाटील 'ऑपरेशन टायगर 2' चा भाग..'; धाराशिवच्या पालकमंत्र्यांनीच दिले राजकीय भूकंपाचे संकेत

भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पक्षसंघटनेतील कामाचा दांडगा अनुभव आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीचा लक्षात घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना आता राजस्थानसारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून शुक्रवारी(ता. 14 ऑगस्ट) जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, महायुती सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार गजेंद्र सिंह पटेल, खासदार संगीता यादव, रोहन गुप्ता आणि दिल्ली सरकारमधील मंत्री रविंद्र इंद्राज सिंह यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी माजी खासदार हरीश द्विवेदी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Chandrashekhar Bawankule
Shivratna Controversy : ‘शिवरत्न’च्या वादात पालकमंत्री गोरेंची उडी : 'सगळ्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या नावाचं कम्पल्शन कशासाठी?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com