Tipu Sultan Controversy : भाजप टिपू सूलतान समर्थक, काँग्रेसने दिले पाच पुरावे; मुंबईच्या महापौर रितू तावडेंचेही घेतले नाव

Tipu Sultan BJP Vs Congress : टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण करत असल्याचा निशाणा काँग्रेसने साधला आहे.
Tipu Sultan photo controversy
Tipu Sultan photo controversySarkarnama
Published on
Updated on

Sachin Sawant News : मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सूलतानचा फोटो लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने टिपू सूलतानाच्या फोटो जोरदार विरोध केला तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समर्थन केले.

दरम्यान, भाजपची टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्याची भूमिका दुटप्पी असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली असून भाजप टिपू सूलतान समर्थक असल्याचे पाच पुरावे त्यांनी दिले आहेत.

सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण करत हे पुराव्यानिशी दिलेल्या उदाहरणांवरून उघड होईल. २०१२ मध्ये अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव “शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान” ठेवण्याचा ठराव भाजपानेच मांडला. सूचक: माजी महापौर व सध्याचे भाजपाचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख व माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल.

दुसरा पुरावा देताना सावंत यांनी सांगितले की, २०१३ – मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला “शहीद टिपू सुलतान मार्ग” नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपाचे नगरसेवक दुथडी भरून उपस्थित तर होते पण सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नाव वर दिसेल बरं!

२००१ – अंधेरी (प) येथे “शेरे म्हैसूर टिपू सुलतान” मार्ग नामकरण. भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजपा नगरसेवकांच्या मांदियाळीत ठराव एकमताने मंजूर. तसेच भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले, असल्याचेही सावंत यांनी सांगितले,

Tipu Sultan photo controversy
Mahayuti Government : अर्थमंत्रिपदाबाबत मोठी अपडेट, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडेच तिजोरीच्या चाव्या, मुख्यमंत्री फडणवीस घेणार निर्णय

टिपूच्या अंगठीत श्रीरामांचे नाव

पाचवा पुरावा सावंत यांनी दिला आहे तो २०१७ मधील. कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाकरिता गौरवोद्गार काढले होते. भाजपाला आधी प्रेम होते पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता आज टिपू सुलतान वाईट झाला या दुटप्पीपणाला काय म्हणावे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आणि हो टिपू सुलतान आपल्या हातात भगवान श्रीरामांचे नाव लिहिलेली अंगठी घालत होते बरं!, असे टोलाही भाजपला लगावला आहे.

Tipu Sultan photo controversy
Nashik Crime : धक्कादायक ! पोलिसांना महिनाभर वेठीस धरलं; 400 कोटींच्या कंटेनर लुटीची तक्रारच निघाली खोटी, सात संशयितांची निर्दोष मुक्तता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com