Rupali Chakankar controversy : रुपाली चाकणकरांना सुनील तटकरे वाचवतायेत, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Vijay Wadettiwar Sunil Tatkare : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. त्यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चाकणकर यांना तटकरे वाचवत असल्याचा आरोप केला आहे.
Rupali Chakankar, Sunil tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : रुपाली चाकणकर यांच्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. नाशिकच्या महिला आघाडीकडून चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या गटाकडून कारवाई करू नये म्हणून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे.

रुपाली चाकणकर यांच्यावरील कारवाई बाबत बोलताना काँग्रेस विधीमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चाकणकर यांना तटकरे वाचवत असल्याचा आरोप केला आहे.

ते म्हणाले, 'जो पर्यंत तटकरे म्हणत नाही तो पर्यंत कारवाई होणार नाही. तटकरेंच्या मनात ज्या दिवशी येईल त्या दिवशी ती कारवाई होईल. अलिकडीच्या घडामोडींवरून चाकणकर आणि तटकरेंनी यांनी खरात प्रकरणात ज्यांची नावे समोर आली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.हे लपून राहिलेले नाही.'

तटकरे सुनेत्रा पवारांना भेटले

आज विधीमंडळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट सुनील तटकरे यांनी घेतली. या भेटीत रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, तटकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Rupali Chakankar, Sunil tatkare
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर अडचणीत, सुनेत्रा पवारांची घेणार भेट, कारवाईबाबत पक्षात दोन गट?

चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर ट्रस्टी होत्या आहेत. आणि या भोंदू बाबाच्या नादाला लागून जर त्यांनी लोकांनी गंडवण्याचं काम केले असेल तर ते चुकीच आहे. त्यामुळे त्यांची देखिल चौकशी होणार हे उघड आहे. चौकशीत काही आढळून येवून पक्षाची बदनामी होण्याच्या आधीच त्यांचा राजीनामा पक्षाने घ्यायला हवा.

Rupali Chakankar, Sunil tatkare
Rupali Chakankar Vs Rupali Patil : सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये रुपाली चाकणकर सूत्रधार, महिला नेत्याच्या पत्राने खळबळ, CM फडणवीस दखल घेणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com