Bjp News : काँग्रेसमधला वाद मिटत नाही, तोच चंद्रपूर भाजपमध्येही उडाला भडका; फडणवीसांच्या दोन नेत्यांमध्ये महापौरपदाच्या उमेदवारीवरुन खटके

Chandrapur mayor election News : भाजपमधील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद समोर आला असून हे दोन नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
Sudhir Mungantiwar, Kishor Jorgewar
Sudhir Mungantiwar, Kishor JorgewarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत सध्या जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. एकीकडे काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या माजी मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वादावर दिल्ली दरबारी पडदा पडला आहे. त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. त्यातच आता दुसरीकडे भाजपने संगीता खांडेकर या भाजपच्या अधिकृत उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यानंतर इकडे भाजपमधील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद समोर आला असून हे दोन नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

चंद्रपुरातील सत्तास्थापनेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी गेल्या काह दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमधील दोन गटातील वाद दिल्लीदरबारी पोहचला होता. तर चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत आता ट्विस्ट पाहावयास मिळत आहे. किंगमेकर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवाराने महापौर पदासाठी उमेदवार रिंगणात उतरवला असल्याने प्रस्थापितांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे भाजपचा उमेदवार जाहीर होताच मुनगंटीवार, जोरगेवार हे आमने-सामने आले आहेत. त्यामुळे सर्वांचे महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे.

Sudhir Mungantiwar, Kishor Jorgewar
Nashik BJP : नाशिकमध्ये भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावली, बहुमत असूनही केला मोठा त्याग

चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 नगरसेवक आहेत. याठिकाणी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 34 नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत तर भाजपकडे 23 नगरसेवक आहेत. भाजप आणि काँग्रेसला (Congress) सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सहा नगरसेवकांची गरज भासणार आहे. शिवसेनेसोबत वंचित आघाडीचे दोन तर अपक्ष दोन नगरसेवक असे 10 नगरसेवक एकत्र आहेत. त्यामुळे कोणाचा महापौर होणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्यातच आता भाजपमधील दोन बड्या नेत्यांमधील वाद समोर आला आहे.

Sudhir Mungantiwar, Kishor Jorgewar
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी उपमहापौरपदासाठी दिलेल्या उमेदवाराला संजय शिरसाट यांचा विरोध? दुसरा उमेदवार देताच शिवसेना सचिवांचे तातडीने पत्र

भाजपकडून (BJP) संगीता खांडेकर या भाजपच्या महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतरही भाजपच्या सारिका संदुरकरांनी गुरुवारी महापौर पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजपमधील दोन नेत्यांमधील वाद या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. या दोन नेत्याने एकमेकांवर तिकी केली असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

Sudhir Mungantiwar, Kishor Jorgewar
Congress Politics : शेवटच्या क्षणी गेम फिरला! महापौर पद काँग्रेसलाच मिळणार, वडेट्टीवार यांची माघार, देशमुख होणार उपमहापौर!

भाजपमध्ये काँग्रेससारखे वागणे महागात पडते, अशी टीका माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तर एकाद्या उमेदवारी अर्जात त्रुटी निघू शकते म्हणून दुसरा अर्ज भरल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे. भाजपमधील या दोन नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे जिल्ह्याचे नेते आहेत, त्यांना आपल्या शब्दाबाहेरील महापौर नको आहे. तर, किशोर जोरगेवार यांना आपल्या समर्थकाची वर्णी लावून शहरावर आपली पकड मजबूत करायची आहे. त्यामुळे आता काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sudhir Mungantiwar, Kishor Jorgewar
Jalna BJP Victory : कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांना सत्तेच्या आजूबाजूलाही फिरकू दिलं नाही; जालन्यात शतप्रतिशत भाजप, महापौरपदी वंदना मगरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com