Chhagan Bhujbal News: राज्यात पेट्रोल अन् डिझेलची टंचाई? मंत्री भुजबळांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक आकडेवारीसह खरं काय ते सांगितलं

Maharashtra Fuel Shortage : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर,राज्य शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यांची पत्रकार परिषद मंत्रालयात सोमवारी (ता.25)बोलावण्यात आली होती.
Minister Chhagan Bhujbal
Minister Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई,पुण्यासह संपूर्ण राज्यभरातच पेट्रोल,डिझेलसाठी ग्राहकांच्या पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे. काही लोकं पेट्रोल-डिझेलसाठी तिथेच तळ ठोकून आहे. कुठे कर्मचारी-ग्राहक यांच्यात वादावादी झाल्यानंतर हाणामारीपर्यंत प्रकरण गेल्याचंही पाहायला मिळालं. लासलगावसारख्या कांद्याची मोठी बाजारपेठेतही डिझेलटंचाईमुळे शेकडो ट्रक अडकून पडल्याचं समोर आलं होतं. अशातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी धक्कादायक दावा केला आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर,राज्य शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यांची पत्रकार परिषद मंत्रालयात सोमवारी (ता.25)बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राज्यातील पेट्रोल-डिझेल वितरणाच्या आढाव्यासह इंधन टंचाईबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली.

अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा राज्यात पेट्रोल आणि डिझेलसह कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचा दावा केला आहे. तसेच ठामपणे राज्यात पेट्रोल अन् डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही दिली आहे.

याचदरम्यान, छगन भुजबळ यांनी काही भागांत पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त इंधन खरेदी करत असल्याचं विधान केलं आहे. याचमुळे पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून येत असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना भीतीपोटी कोणत्याही इंधनाचा अनावश्यक साठा न करण्याचं आवाहन केलं आहे.

Minister Chhagan Bhujbal
Ashok Chavan News: अशोक चव्हाणांचा लाडका उमेदवार इतिहास घडवणार; 36 वर्षानंतर पहिल्यांदाच 'स्थानिक'च्या नांदेड मतदारसंघात कमळ फुलणार ?

या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेल्या राज्यातील जिल्हानिहाय विक्रीच्या आकडेवारीनुसार दैनंदिन विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यात पेट्रोल विक्रीत जवळपास 23 टक्के तर डिझेल विक्रीत तब्बल 52 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

मंत्री छगन भुजबळ यावेळी तेल कंपन्यांसह जिल्हा आणि तालुका स्तरावर नागरिकांमध्ये इंधन टंचाईच्या पसरत असलेल्या अफवांविरोधात जनजागृती करण्याबाबतचे निर्देशही दिले आहेत. तसेच नागरिकांपर्यंत राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून त्याचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याची माहिती पोहोचवण्याविषयीच्या सूचनाही केल्या.

Minister Chhagan Bhujbal
Satara-Sangli MLC : सातारा-सांगली विधान परिषदेसाठी प्रदेश भाजपने चार नावे केंद्रीय निवड समितीला पाठवली; इच्छुकांचे डोळे दिल्लीकडे...

यावेळी त्यांनी राज्यातील काही घटनांचा संदर्भ देत काही ठिकाणी इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यताही बोलून दाखवली. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनासह मोठ्या प्रमाणातील इंधन खरेदीवर लक्ष ठेवत साठेबाजी रोखण्यासह संबंधितांवर कठोर कारवाईच्या सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

या बैठकीत राज्यातील काही जिल्ह्यांत डिझेलच्या विक्री 60 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढल्याचंही सांगण्यात आलं. तसेच विदर्भातील बुलढाण्यात पेट्रोल विक्रीत 47 टक्के, अकोल्यात 44 टक्के, जालन्यात 49 टक्के तर वर्ध्यात 43 टक्क्यांनी वाढ झाल्याचं नोंदविण्यात आल्याची माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com