Congress News : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठ्या फेरबदलाच्या हालचाली : 37 केंद्रीय निरीक्षकांसह राज्यातील 183 दिग्गज नेत्यांची फौज मैदानात

Congress News : मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने संघटन सृजन अभियानातून महाराष्ट्रात बूथ स्तरावर सर्जिकल स्ट्राईक करत 183 नेत्यांसह व्यापक संघटनात्मक फेरबदलांना सुरुवात केली आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेस पक्षाने आता थेट बूथ स्तरावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची रणनीती आखली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानने महाराष्ट्रात धडक देत पक्ष संघटनेत व्यापक फेरबदलांची प्रक्रिया सुरू केली आहे. या मोहिमेमुळे चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. ३७ केंद्रीय निरीक्षकांसह राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि डॉ. नितीन राऊत यांसारख्या तब्बल १८३ नेत्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, हे नेते थेट जिल्हा पातळीवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या अभियानाचा सर्वात मोठा फटका सुस्त व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत. बूथपासून ते राज्य स्तरापर्यंत नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार आहेत. यानंतर केवळ कर्तृत्व आणि कामगिरीच्या आधारावरच संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Congress News
Nashik ZP : नाशिक जिल्हा परिषदेची ई-गव्हर्नन्समध्ये भरारी; CEO ओमकार पवारांचा CM फडणवीसांच्या हस्ते सन्मान

महिला आणि तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी देत संघटनेत नवचैतन्य आणण्यावर भर दिला जाणार आहे. गटबाजीला आळा घालणे, जबाबदाऱ्यांचे पारदर्शक वाटप करणे आणि समर्पित कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून केडर बेस मजबूत करणे ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सत्ताधारी पक्षाच्या भक्कम निवडणूक यंत्रणेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने सृजन हे नवे अस्त्र उचलले असल्याचे मानले जात आहे.

Congress News
Ashok Kharat : अशोक खरात सारखे भोंदूबाबांचे अड्डे कोकणात? शिंदेंच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात 'भोंदूगिरी'वर बोट!

जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांपासून ते बूथ कमिट्यांच्या रचनेपर्यंत आता थेट दिल्लीची नजर राहणार असल्याने स्थानिक पातळीवरील आपला माणूस संस्कृतीला आळा बसण्याची शक्यता आहे. मेरिटवर आधारित नेतृत्व उभे करण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीने स्पष्ट केले आहे. हे हायटेक आणि लोकाभिमुख अभियान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com