Maharashtra Politics : काँग्रेसने हकालपट्टी केलेला बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला, भाजप आमदाराविरोधात सापडला पर्याय

Sahebrao Kamble Joins Shivsena : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या साहेबराव कांबळेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
Sahebrao Kamble Joins Shivsena
Sahebrao Kamble Joins Shivsena sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs BJP : विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊनही ऐनवेळी माघार घेणाऱ्यांवर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. यवतामळमधून उमेदवारी मिळालेले साहेबराब कांबळे यांनी संख्याबळ नसल्याचे सांगत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या निर्णयानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबीत केले.

साहेबराव यांची काँग्रेसमधून हकालपट्टी होताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा निर्णय घेण्यात आला. साहेबराब कांबळे यांना शिंदेंनी आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या किसनराव वानखेडेंच्या विरोधात त्यांना तगडा उमेदवार मिळाल्याची चर्चा आहे.

साहेबराव कांबळे हे 2024 मध्ये उमरखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार किसनराव वानखेडे यांच्याकडून 16 हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यांनी तब्बल 92 हजार मतं घेतली होती. तर, किसन वानखेडे यांनी एक लाख आठ हजार मतं घेतली होती.

Sahebrao Kamble Joins Shivsena
Rajya Sabha Vacancy : राज्यसभा जागेवरून राष्ट्रवादी पेचात; भुजबळ, मुंडे, आदिकांसह नवनीत राणांच्याही नावाची चर्चा!

काँग्रेसकडून निलंबन का?

विधान परिषद निवडणुकीत यवतमाळमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले. साहेबराव कांबळेंनी माघार घेत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे कांबळे यांना नोटीस पाठवून काँग्रेसने त्यांचे पक्षातून निलंबन केले. नोटीसमध्ये पक्ष नेतृत्वाला अंधार ठेऊन उमेदवारी मागे घेण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

Sahebrao Kamble Joins Shivsena
Congress Action : चुकीला माफी नाही! काँग्रेसमधून दोघांचे निलंबन, उमेदवारी घेतली अन्..., 'ती' चूक महागात पडली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com