Maharashtra irrigation scam: 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याविरोधात लढलेल्या फडणवीसांना मोठा धक्का : गुन्हा दाखल केलेल्या कॉन्ट्रॅक्टरलाच द्यावे लागणार 303 कोटी

FA Enterprises compensation : या घोटाळ्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे आली होती. आता याच पार्श्वभूमीवर आता कोर्टाकडून अतिशय महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवित याप्रकरणी महत्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत.
Mumbai High Court
Mumbai High CourtSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एफ. ए. एंटरप्रायजेस या कंपनीविरोधात एसीबीने तब्बल तीन हजार पानाचे आरोपपत्र दाखल केले होते. गंभीर अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान बाणगंगा धरणाचे अपूर्ण राहिलेले काम मात्र ही कंपनी आता करणार नाही. कारण 2016 साली कॉन्ट्रॅकट रद्द करण्यात आले होते. या घोटाळ्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे आली होती. आता याच पार्श्वभूमीवर आता कोर्टाकडून अतिशय महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवित याप्रकरणी महत्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत.

संपूर्ण 70 हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. या बाणगंगा धरणाचे काम एफ. ए. एंटरप्रायजेस ही कंपनी पाहत होती. त्याला हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 303 कोटी रुपयांची भरपाई एफ. ए. एंटरप्रायजेसला देण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

Mumbai High Court
Uddhav-Raj Thackeray Defeated : मोठी बातमी! पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधुंचा दारुण पराभव, 'बेस्ट'मध्ये भोपळाही फुटला नाही!

बाळगंगा धरण प्रकल्पावर या सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन सरकारला विरोधकांनी चांगलाच कोंडीत पकडले होते. 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यावरून एफ. ए. एंटरप्रायजेस या कंपनीच्या विरोधात तब्बल तीन हजार पानाचे आरोपपत्र दाखल केले होते. त्या आरोपपत्रात अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप केले होते. दरम्यान बाणगंगा धरणाचे अपूर्ण राहिलेले काम मात्र ही कंपनी आता करणार नाही.

Mumbai High Court
BEST Election Results : "ठाकरेंना जागा दाखवली, ब्रँडच्या बॉसला..." बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा ठाकरे बंधुंवर पहिला वार

हायकोर्टाने दिलेले हे आदेश एफ. ए. एंटरप्रायजेस या कंपनीसाठी दिलासा मानले जात आहेत. यापूर्वी ट्रिब्युनलमध्ये गेल्यानंतर अशास्वरूपाचे दिलासा देणारे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टाकडे (Mumbai Highcourt) वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने ट्रिब्युनलचे आदेश रद्द केले होते. त्यानंतर दोन न्यायमूर्तींच्या कोर्टाने त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे पैसे देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Mumbai High Court
Best Employees Credit Society Election : 'बेस्ट पतपेढी'चा निकाल; अंजली दमानियांना झालाय खूप आनंद, कारण त्यांनीच सांगितलं!

दरम्यान, लढून काहीच उपयोग नाही असे वाटायला लागले आहे. जीवाची पर्वा न करता, वेड्यासारखे सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढलो. त्या निसार खत्री नावाच्या काँट्रॅक्टरला जेलमध्ये पाठवले आणि आज त्याच व्यक्तिला, उरलेले ३०० कोटी देण्याचा आदेश, उच्च न्यायालयाने दिला आहे, लढण्याची ताकद आणि इच्छा दोन्हीही संपत चालली आहे. असे ट्विट अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी केले आहे.

Mumbai High Court
Vice President election India : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ठरणार रंगतदार, भाजपच्या राधाकृष्णन यांची वाट बिकट! महाराष्ट्रातूनच बसणार मोठा धक्का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com