Vice President election India : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ठरणार रंगतदार, भाजपच्या राधाकृष्णन यांची वाट बिकट! महाराष्ट्रातूनच बसणार मोठा धक्का?

BJP candidate Radhakrishnan News : या निवडणुकीत पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्रातून कोणाला मताधिक्क्य मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
c.p.radhakrishn, sudarshan reddy
c.p.radhakrishn, sudarshan reddy Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत बाजी मारली होती. त्यानंतर इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात सुदर्शन रेड्डी यांनी संधी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्रातून कोणाला मताधिक्क्य मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 68 मतदार आहेत. पक्षीय बालाबल पाहता कोणाला आघाडी मिळणार याची उत्सुकता कायम होती. उपराष्ट्रपती पदाचा धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी निवडणुकीची घोषणा झाली. एकंदरीत संख्याबळ पाहिल्यानंतर एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विजयी होतील, असे चित्र वाटत होते. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र दिसत होते.

c.p.radhakrishn, sudarshan reddy
Uddhav-Raj Thackeray Defeated : मोठी बातमी! पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधुंचा दारुण पराभव, 'बेस्ट'मध्ये भोपळाही फुटला नाही!

ऐन निवडणूक रिंगणात आल्याने इंडिया आघाडीने या निवडणुकीच्या रिंगणात दक्षिणेकडील उमेदवार रिंगणात उतरवत भाजपसमोरील टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेली उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे.

c.p.radhakrishn, sudarshan reddy
Thackeray brothers election loss : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा घात का झाला? 'ही' रणनीती ठरली धोकादायक

तामिळनाडूचे असलेले सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रातील खासदाराशी चांगला संपर्क राहिला आहे. सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे मतदार असल्यानं राज्यातील सगळ्या खासदारांनी त्यांना मतदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाकडे व शरदचंद्र पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, हे दोन्ही पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता कमी आहे.

c.p.radhakrishn, sudarshan reddy
BEST Election Results : "ठाकरेंना जागा दाखवली, ब्रँडच्या बॉसला..." बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा ठाकरे बंधुंवर पहिला वार

महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता एकूण 68 खासदार आहेत. महाविकास आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभेचा विचार करता 38 खासदारांचे बळ आहे. तर महायुतीचा आकडा 30च्या घरात जातो. त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडे जड वाटत आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या संख्याबळापेक्षा अधिकची मते राधाकृष्णन यांना मिळावीत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत किती खासदार येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

c.p.radhakrishn, sudarshan reddy
Best Employees Credit Society Election : 'बेस्ट पतपेढी'चा निकाल; अंजली दमानियांना झालाय खूप आनंद, कारण त्यांनीच सांगितलं!

महाराष्ट्रात लोकसभेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसकडे 13, भाजप 9, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 9, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस 8, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 7, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 1 (काँग्रेस समर्थक) असे महाविकास आघाडी 31, महायुती 17 असे संख्याबळ आहे.

c.p.radhakrishn, sudarshan reddy
BEST Election Result : 'बेस्ट'मध्ये ठाकरे बंधुंना 'धोबी पछाड', शशांक रावांनी सांगितलं विजयाचे रहस्य; म्हणाले, 'शिवसेनेमुळेच...'

दुसरीकडे राज्यसभेत एकूण 20 खासदार आहेत. त्यापैकी भाजप 7, काँग्रेस 3, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) 2, एकनाथ शिंदे शिवसेना 1, रिपाईं 1, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 3, राष्ट्रपती नियुक्त 1 असे महाविकास आघाडी 7, महायुती 13 असे संख्याबळ आहे.

c.p.radhakrishn, sudarshan reddy
Chandrashekhar Bawankule BJP : जिल्हाध्यक्षांनी निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्याला मोठी संधी? कारण त्याच्या घरी पोचले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे!

महाराष्ट्रातीलआकडेवारी पाहता एकूण 68 खासदार आहेत. महाविकास आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभेचा विचार करता 38 खासदारांचे बळ आहे. तर महायुतीचा आकडा 30 च्या घरात जातो. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचे पारडे जड वाटत आहे. तर दुसरीकडे एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असून देखील त्यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

c.p.radhakrishn, sudarshan reddy
BJP Vs Rahul Gandhi: भाजपचं एकच ट्विट; बिहारमध्ये राहुल गांधी अन् तेजस्वी यादव यांच्या आरोपांचा 'तो' बॉम्ब ठरला फुसका बार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com