Devendra Fadnavis News : फडणवीसांचा जागावाटपावरुन शिंदे, अजितदादांना इशारा; म्हणाले, 'तोफ मागितली की बंदूक मिळते...'

Political News : महायुतीचे जागावाटप लवकरच सुरु करणार असल्याचे एका मुलाखतीप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करताना जागावाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे महायुती बॅकफूटवर आली आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने महायुतीने तयारी सुरु केली आहे.

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने (Bjp) आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच महायुतीचे जागावाटप लवकरच सुरु करणार असल्याचे एका मुलाखतीप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट करताना जागावाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे. (Devendra Fadnavis News )

येत्या काळात आम्ही व्यवस्थित सीट शेअरिंग करू. ज्याची जेवढी शक्ती आहे, तेवढ्या जागा त्यांना मिळतील. प्रत्येकाला आपली शक्ती माहित आहे अन मर्यादाही माहित आहेत. त्यामुळे मागताना प्रत्येकाला जास्तच जागा मागाव्या लागतात, राजकारणात तोफ मागितली की बंदूक मिळते.

त्यामुळे प्रत्येकजण मागताना जास्तच जागा मागत असतो. प्रत्येकाला आपली ताकद माहित असते. त्या ताकदी प्रमाणे येत्या काळात जागावाटप करण्यात येईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला.

महायुतीच्या बैठका सुरु झाल्या आहेत. आमची दिशाही ठरली आहे. चार-पाच जागासाठी ओढाताण होईल. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ती कमी असणार आहे. त्यामुळे या वेळी जागा वाटपाला फार वेळ लागणार नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Bjp News : भाजपची अशीही कोंडी; विधानसभेसाठी विद्यमान आमदारांना नारळ, नव्या चेहऱ्यांना द्यावी लागणार संधी

लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या हे देखील लक्षात आले की, काही जागा आम्ही शेवटपर्यंत ताणून धरल्या होत्या. त्याचा या निवडणुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी निवडणूक आमच्या हातातून निघून गेल्यासारखी वाटली. त्यामुळे या निवडणुकीत लवकर जागावाटप पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागावाटपाचे सर्व अधिकार भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी त्यांना करावी लागणार आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Bjp News : उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक; अयोध्येत सीएम योगी सक्रिय, अखिलेशही ॲक्शन मोडमध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com