

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या चार दिवसापासून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या निवडणुकीसाठी महायुती न करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी घेतला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती होणार नसल्याचे स्पष्ट होत असतानाच आता दुसरीकडे माजी मंत्री तानाजी सावंतांना मोठा धक्का बसला आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी शिवसेनेची साथ सोडत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंडा तालुक्यातील पाच जिल्हा परिषदेचे गट व दहा पंचायत समितीचे गणात त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे सावंत यांच्या कुटूंबात फूट पडल्याचे दिसत असून त्यांचे बंधू शिवाजी सावंत आणि पुतणे पृथ्वीराज सावंत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. माढा तालुक्यातील मानेगाव जि. प. गटाची उमेदवारी माजी मंत्री तानाजी सावंतचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांना देण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कुटुंबात राजकीय फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. ती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खरी ठरली आहे. पुतणे धनंजय सावंत यांनी तानाजी सावंतांचे फोटो टाळून स्वतंत्र बैठकांचा धडाका लावला होता. तर तानाजी सावंत भाजपविरोधात आक्रमक असताना धनंजय सावंत भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या अंतर्गत कलहामुळे शिंदेसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
अखेर माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत आणि पुतणे पृथ्वीराज सावंत भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. माढा तालुक्यातील सावंत कुटुंब अखेर भाजपमध्ये दाखल झाले असून मानेगाव जि. प. गटाची उमेदवारी माजी मंत्री तानाजी सावंतचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांना देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधु शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी त्यांच्या मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मानेगाव जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज सावंत यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळवत अखेर बुधवारी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
भाजप प्रवेशाला बंधू तानाजी सावंत आडवे येत असल्याचे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी शिवाजी सावंत यांनी केले होते. त्यामुळे आता सावंत घरात राजकीय फूट पडल्याचे समोर आले आहे. शिवाजी सावंत भाजपमध्ये दाखल झाल्याने माढ्यातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत. तर दुसरीकडे माझी राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने सफल झाल्याची प्रतिक्रिया भाजप प्रवेशानंतर शिवाजी सावंतानी दिली आहे.
मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी शिवसेनेची साथ सोडत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंडा तालुक्यातील पाच जिल्हा परिषदेचे गट व दहा पंचायत समितीचे गणात त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघात धनंजय सावंत काय चमत्कार घडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.