

Mumbai News : विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीमध्ये वादाचा भडका उडाला आहे. यात अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या दिवाळीशी संबंधित व्हिडीओ डिलीट केल्याने तेल ओतले गेले आहे. मुंबई महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील दिया मिर्झा यांची पाठराखण केली आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी, अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या आवाहनात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आणि सुरज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या व्हिडीओ हटवण्याच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता येत्या काळात महायुतीमधील मित्रपक्षातच वाद होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. नागपूर व पुण्यातील पराभव भाजपच्या (BJP) जिव्हारी लागला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडील नेत्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तसेच यापूर्वीही नाशिक विधानपरिषद निवडणूक, सातारा जिल्हा परिषद निवडणूक व त्यानंतर झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही पक्षामध्ये उघडपणे मतभेद दिसून आले होते.
त्यानंतर आता अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या दिवाळीशी संबंधित व्हिडीओ डिलीट केल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. मुंबई महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील दिया मिर्झा यांची पाठराखण केली आहे. उपमहापौर घाडींचा भाजपच्या भूमिकेला विरोध केला आहे. मुंबई महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेले एकनाथ शिंदे शिवसेनेने (Shivsena) देखील दिया मिर्झा यांची पाठराखण केली आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी. अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या आवाहनात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने अभिनेत्रीचा संदेश हटवण्याची किंवा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्याला विरोध करण्याची कोणतीही गरज नव्हती, असेही स्पष्ट केले.
बीएमसी भाजपचे पक्ष कार्यालय नाही
भिवंडीमधील आमदार रईस शेख यांनी, मुंबई महापालिका ही नागरी संस्था आहे, भाजपचे पक्ष कार्यालय नाही, असा टोला लगावला. महापालिकेच्या स्वतःच्या पोस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला होता. मग केवळ दिया मिर्झा यांचाच व्हिडिओ का हटवण्यात आला आणि इतरांचे व्हिडिओ अजूनही कायम का आहेत? याबाबत मुंबई महापालिकेने मुंबईकरांना स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचाही विरोध
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आणि सुरज चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी दिया मिर्झा प्रकरणावर बोलताना टीका केली. आपण संविधान मानणारे भारतात राहतो. दिया मिर्झा यांनी सामाजिक संदेश दिला होता. मुंबईतील AQI वाढत असताना प्रदूषणमुक्त दिवाळी कशी साजरी करावी, याबाबत त्या बोलत होत्या. मात्र, या संदेशाला वेगळा अँगल देऊन विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी एक चांगला सामाजिक संदेश दिला होता. महापौरांनी अशा प्रकारची भूमिका मांडणे, हे घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला शोभणारे नाही, असा आरोप पत्रकार परिषदेवेळी केला.
दिया मिर्झा यांनी कोणतेही धार्मिक विधान केले नव्हते, तर सामाजिक संदेश दिला होता. त्यांचा व्हिडीओ डिलीट करायला नको होता. उच्च न्यायालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. हवेचा समतोल राखण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अमित साटम यांना आडनावावरून काहीसा संभ्रम झाला असेल. मात्र, त्यांनी दिलेला सामाजिक संदेश महत्त्वाचा होता. प्रदूषणाविरोधात जे कोणी काम करतील, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.