Dattatray Bharne: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका : कृषी मंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या आढावा बैठका रद्द

Drought review meetings in Pune and Nagpur divisions were cancelled: विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पुणे आणि नागपूर विभागातील दुष्काळ आढावा बैठका रद्द झाल्या. दुष्काळ निवारणाच्या नियोजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Drought Review Meetings : विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे दुष्काळ निवारण आणि नियोजनाच्या बैठकांना लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांना पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित आढावा बैठका अखेर रद्द कराव्या लागल्या आहेत.

निवडणूक आयोगाने औरंगाबाद, पुणे व नागपूर विभाग पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांसाठी २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून २३ ऑक्टोबर रोजी मतदान व २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणुका जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. आयोगाच्या नियमांनुसार, आचारसंहितेच्या काळात कोणताही मंत्री किंवा राजकीय पदाधिकारी दुष्काळ निवारण कार्यात किंवा आढावा बैठकांमध्ये सहभागी होऊ शकत नाही. संपूर्ण मदत कार्य केवळ शासकीय प्रशासनामार्फतच राबवणे बंधनकारक आहे.

Dattatray Bharne
Maharashtra Government : दुष्काळ आढाव बैठक की जनतेची थट्टा? मराठवाड्यात काजू-बदाम अन् विदर्भात मोबाईलवर टाईमपास

राज्यात दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर लोकभावना आणि प्रत्यक्ष मदतीची गरज जाणून घेण्यासाठी कृषी विभागाने आढावा बैठकांचे आयोजन केले होते. या बैठकांच्या परवानगीसाठी कृषी मंत्र्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी मागणी केली होती. मात्र, आयोगाने या पत्राला कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर कृषी विभागावर या महत्त्वाच्या बैठका रद्द करण्याची वेळ आली.

Dattatray Bharne
Maharashtra drought : काजू-बदाम वादानंतर भरणेंचा ‘दुष्काळ’ दौरा वादात; 50 हजार मदतीवर म्हणाले, निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील

दुष्काळाची दाहकता समजणार का?

लोकप्रतिनिधींना या बैठकांपासून दूर ठेवल्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणि स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती राज्य सरकारपर्यंत कशी पोहोचणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संपूर्ण यंत्रणा केवळ अधिकाऱ्यांच्या हाती सोपवल्याने दुष्काळ निवारणाचे काम कितपत गांभीर्याने आणि तत्परतेने होईल, याबाबत शेतकरी व राजकीय वर्तुळातून शंका व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com