

Eknath Shinde Politics : लोकसभा ते पालिका निवडणुकी आता पार पडल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षात मोठी भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षामध्ये तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणुका होणार असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
या निवडणुकांचे बिगुल जुलै अखेरीस वाजण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने पार पडणार असून, एकूण सात टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शिवसेना पक्षातील विविध पदांसाठी आता नेत्यांना पक्षांतर्ग निवडणूक लढवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुलै अखेरपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शाखाप्रमुख पदापासून ते वरिष्ठ नेते पदांपर्यंत या निवडणुका होणार असल्याची माहिती.
शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना पक्षाचे मुख्यनेते पद देण्यात आले होते. आत्ता देखील ते पक्षाचे मुख्यनेते आहेत. एकनाथ शिंदे यांना स्वतःलाही त्यांच्या 'मुख्य नेता' या पदासाठी या अंतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.