Shivsena Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला? मेळाव्याच्या बॅनरवर तानाजी सावंतांचा फोटोच नाही

Eknath shinde Cancelled Madha tour : सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्यात मेळाव्याच्या संदर्भात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, शिवाजी सावंत यांच्याकडून आयोजित मेळाव्यात तानाजी सावंतांचे फोटो नाहीत.
Eknath Shinde   Tanaji Sawant
Eknath Shinde | Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे चित्र सुरू आहे.माढा येथे शिवसेनेचा मेळाव्याचे शिवाजी सावंत यांच्याकडून करण्यात आले आहे. मात्र, या मेळाव्यासाठी जे बॅनर लावले आहेत त्यामध्ये तानाजी सावतं यांचा फोटोच नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे शिवाजी सावंत हे तानाजी सावंतांचे बंधू आहेत. शिवाजी सावंत यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी आहे.

सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्यात मेळाव्याच्या संदर्भात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, शिवाजी सावंत यांच्याकडून आयोजित मेळाव्यात तानाजी सावंतांचे फोटो नाहीत. या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें हे उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी आपला दौरा रद्द केल्याची माहिती आहे.

Eknath Shinde   Tanaji Sawant
Sharad Pawar and Ajit Pawar : 15 दिवसांत दादा अन् साहेब आले तिसऱ्यांदा एकत्र; अजित पवार म्हणाले, 'बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याची गरज नाही..'

मेळाव्यातील आमंत्रण पत्रिकेवर देखील तानाजी सावंत यांचे नाव नव्हते. त्यामुळे सावंत कुटुंबात अंतर्गत कुरबूर असल्याच्याही चर्चा आहेत. एकनाथ शिंदे हे आपल्या माढ्यात दौऱ्यात मेळाव्यात मार्गदर्शन करणार होते. मात्र, त्यांनी अचनाक दौरा रद्द केल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

उपमुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द

मागील तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी शेतात रमले आहेत. ते शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्ताने माढा दौऱ्यावर येणार होते. शिंदे हे दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासन देखील तयारी होते. मात्र, अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Shinde   Tanaji Sawant
Water Scheme Corruption : साडे तीनशे कोटींची योजना पावणे तीन हजार कोटींवर, तरी पाण्याचा थेंब नाही! खरे 'लबाड' कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com