

Satara News : राज्यात विधानपरिषदेच्या 11 जागेसाठी 18 जूनला मतदान होत आहे. यापूर्वी सहा ठिकाणची निवडणूक बिनविरोध करीत महायुतीने बाजी मारली आहे. त्यातच आता उर्वरित 11विधानपरिषदेच्या जागेवरील निवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे.
या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिवसभर दिल्लीतील कार्यक्रम आटोपून थेट दरेगावात दाखल झाले आहेत.
याठिकाणी दोन दिवस मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे आगामी काळात होता असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय रणनीती आखणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात शिंदेच्या शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यापुढे अपक्ष गणेश हाके यांनी आव्हान उभे केले असताना अत्यंत घाईघाईने आणि अचानक ठरलेल्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक प्रशासनात कमालीची लगबग पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे आपला नवी दिल्लीतील नियोजित दौरा संपवून विशेष विमानाने दिल्ली विमानतळावरून थेट पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुण्यात उतरल्यानंतर तिथून त्यांनी गाडीने सातारा जिल्ह्यातील दरे गावाकडे प्रवास केला. मध्यरात्री साधारण 2.30 वाजता ते त्यांच्या दरे येथील निवासस्थानी पोहोचले.
राज्यात गेल्या एकही दिवसापासून विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु आहे. विधानपरिषदेच्या 11 जागेसाठी 18 जूनला मतदान होत आहे. त्यामुळे आगामी काळात होता असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची काय रणनीती आखणार याबाबत उत्सुकता लागली आहे. शिंदे दरेगावात दोन दिवसांचा मुक्काम करणार असल्याचे समजते.
सध्या राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुका आणि इतर स्थानिक राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात शिंदेच्या शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यापुढे अपक्ष गणेश हाके यांनी आव्हान उभे केले आहे असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा हा दोन दिवसांचा दरे गावचा मुक्काम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हा दौरा जरी खासगी कामांसाठी असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दोन दिवसांच्या मुक्कामात दरे आणि परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. यावेळी ते महाबळेश्वर तालुक्यातील या दुर्गम भागात सुरू असलेले रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांच्या कामांचा ते आढावा घेतील. या दौऱ्यादरम्यान स्थानिक प्रशासकीय अधिकारीही दरे गावात उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
दरे आणि आसपासच्या भागात समूह शेती आणि जागतिक दर्जाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनातर्फे विविध प्रकल्प राबवले जात आहेत. या कामांच्या प्रगतीची पाहणी एकनाथ शिंदे स्वतः करणार असल्याचे बोलले जात आहे. आपल्या या गावरान दौऱ्यात ते नेहमीप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.