

Mumbai News : शिवसेनेत 2022 साली फूट पडल्यापासून दोन स्वतंत्र दसरा मेळावे होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवाजी पार्कवर मेळावा होतो. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे होत आहे. दोन्ही शिवसेनेने मंगळवारी होत असलेल्या दसरा मेळाव्याची मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. त्यातच आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावखेड्यातून आणि दूरच्या जिल्ह्यांतून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येतात त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा मंगळवारी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलणार ? याची उत्सुकता लागली आहे. मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येणार असल्याची शक्यता गृहीत तयारी सुरु आहे.
त्यातच आता एकनाथ शिंदे (Ekanth shinde) यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावखेड्यातून आणि दूरच्या जिल्ह्यांतून कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी मुंबईत येऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. राज्यातील काही भागातील परिस्थती गंभीर आहे. त्यामुळे त्या भागातील शिवसैनिकानी मेळाव्यासाठी मुंबईत येऊ नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, मंगळवारी होत असलेल्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. या दसरा मेळाव्यात प्रमुख नेत्यांकडून आगामी निवडणुका, विरोधकांवर टीका आणि पक्षाची पुढील दिशा यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.