Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज; भर बैठकीतच दिले आदेश, म्हणाले, 'येत्या काळात मतदारसंघाऐवजी...'

Maharshtra Drought Review News : राज्यात दिवसेंदिवस दुष्काळाच्या झळा मोठ्याप्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांवर अनेक जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यानिमित्ताने महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. बंडखोरीमुळे तीन पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असतानाच शिवसेनेच्या मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समोर आले आहे. याबाबत शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून मंत्र्यांना तंबी दिली. दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी येत्या काळात मतदारसंघाऐवजी दुष्काळी जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश दिले.

राज्यात दिवसेंदिवस दुष्काळाच्या झळा मोठ्याप्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांवर अनेक जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांचे दौरे का करत नाही? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या मंत्र्याना केला. ज्या मंत्र्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. त्या मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना शिंदेंनी यावेळी दिल्या.

येत्या काळात मतदारसंघाऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा नेमक्या काय आहेत? काय मदत अपेक्षित आहेत? येणाऱ्या अडचणी काय आहेत? याचा आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी मंत्र्यांना दिले आहेत. दुष्काळी जिल्ह्याचा दौरा करून त्याचा संपूर्ण अहवाल पुढील 10 दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेकडून मदतीचे नियोजन करून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मदत पाठवण्याचे नियोजन करण्यातयेणार असल्याचे शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

Eknath Shinde
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड; पाच उमेदवारांविरोधात अपात्रतेची याचिका

मंत्र्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आलेल्या जिल्ह्यात जाऊन जिल्हाप्रमुख आमदार आणि शहरप्रमुखांच्या बैठका घेऊन प्रत्येक गावात पोहचून परिस्थिती जाणून घ्या, अशा देखील सूचना शिंदेंनी दिल्या आहेत. नेक मंत्री पालकमंत्रिपदाची जबाबदारी असलेल्या जिल्ह्यात फार सक्रिय नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करायला हवे, अशी खंत मंत्र्यांच्या बैठकीत शिंदेंनी व्यक्त केली.

Eknath Shinde
Pune Teachers MLA Election : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचे टेन्शन वाढणार, पुण्यात भाजप शिक्षक मतदारसंघ स्वबळावर लढणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने उत्सुकता वाढली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com