Eknath Shinde On Salman Khan : सलमान खान काय भारतीय नागरिक नाही का? RSS कार्यक्रमातील सहभागावर एकनाथ शिंदेंचा सवाल

Salman Khan RSS event : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला सलमान खान उपस्थितीत राहिल्याने खासदार संजय राऊत यांनी संघावर टीका केली होती.
Eknath Shinde On Salman Khan : सलमान खान काय भारतीय नागरिक नाही का? RSS कार्यक्रमातील सहभागावर एकनाथ शिंदेंचा सवाल
Published on
Updated on

Maharashtra politics : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तीन दिवसांपूर्वी मुंबईतील नेहरू सेंटर सभागृहात भव्य कार्यक्रम पार पडला. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान यांनीही हजेरी लावली होती. बॉलीवूडमधील अनेक कलाकार यावेळी उपस्थितीत होते. मात्र सलमान खान यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या व त्याची जोरदार चर्चा झाली.

राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यक्रमात अनेक बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी सहभाग घेतला होता. मात्र सलमान खान RSS च्या कार्यक्रमाला आल्यानंतर सगळ्या कॅमेऱ्यांची तोंडं एका झटक्यात त्याच्याकडे वळाली. दरम्यान त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सलमान खानच्या उपस्थितीतीवर सवाल उपस्थितीत केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शाखांमध्ये आता येथून पुढे सर्वच मुस्लिमांना प्रवेश मिळेल का असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थितीत केला. सलमान खान कधीपासून संघाचा स्वयंसेवक झाला असा खोचक टोला राऊत यांनी लगावला होता.

दरम्यान यावरुन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान भारतीय नागरिक नाही का ? असा सवाल करीत सलमान खानने मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे यात काहीही गैर नाही, असे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की सलमान हा भारतीय नागरिक आहे आणि आपल्या संस्कृतीचा आदर करतो. त्यामुळे त्यात कोणतेही राजकारण करु नये.

Eknath Shinde On Salman Khan : सलमान खान काय भारतीय नागरिक नाही का? RSS कार्यक्रमातील सहभागावर एकनाथ शिंदेंचा सवाल
Devendra Fadnavis Nashik : भाजपला स्पष्ट बहुमत दिलं, आता नाशिकच्या विकासासाठी फडणवीसांचा मोठा शब्द

आरएसएस ला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभक्त राष्ट्रभक्त म्हणून गेली अनेक वर्षे आपण आरएसएसला पाहात आहोत. कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती आरएसएसच्या माध्यमातून देशाने पहिली आहे. ज्या ज्या वेळी संकट येतात काही आपत्ती येते, तेव्हा आरएसएसचे स्वयंसेवक स्वतः घटनास्थळी जाऊन मदत करतात. त्यांच्या कार्यक्रमात सलमान खान गेले यात काही चुकीचे नाही. सलमान खान देखील भारतीय नागरिक आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde On Salman Khan : सलमान खान काय भारतीय नागरिक नाही का? RSS कार्यक्रमातील सहभागावर एकनाथ शिंदेंचा सवाल
Narayan Rane : मोठी बातमी! खासदार राणेंची अचानक तब्येत बिघडली; तातडीने मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

सलमान खान संघाच्या कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचा प्रश्नच काय? सलमान खान आपल्या संस्कृतीला मानतो. त्यांचे कुटुंब आपली संस्कृती मानते. तो घरी गणपती बसवतो, सर्व काही करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले. तो मुंबईकर असल्याने, तो मुंबईतील कार्यक्रमाला गेला होता. या मुद्द्यावर राजकारण करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com