Eknath Shinde Setback : चार नगरसेवक अपात्र, ठराव मंजूर; कायदा काय सांगतो?

Hirwarkhed Councillors Disqualification : भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार झटका दिला आहे. बहुमताच्या आधारे शिवसेनेचे चार नगरसेवकांचा अपात्रतेचा प्रस्ताव मंजुर केला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News : अकोला जिल्ह्यातील हिरवखेड नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या चार नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला. 15 विरुद्ध 5 अशा बहुमताने पारित करण्यात आला आहे.

शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये आधीच विधानपरिषद आणि जिल्हा बँक निवडणुकीवरुन तणाव असताना पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला झटका दिलाय.

हिवरखेड नगरपरिषदेतील नगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या चार नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा ठराव विशेष बहुमताने पारित केले. हिवरखेड नगरपरिषेदत शिवसेनेचे एकूण 5 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी, रवी घुंगड, ऋषिकेश पंचबुद्धे, रामेश्वर हागे आणि श्यामशील भोपळे या चार नगरसेवकांविरोधात भाजपच्या 12 नगरसेवकांनी अपात्रतेचा प्रस्ताव दिला होता.

बुधवारी झालेल्या विशेष सभेत हातवर करून मतदान घेण्यात आले आणि ठरावाच्या बाजूने 15, तर विरोधात 5 मतं पडलीत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसनेच्या चार नगरसेवकांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे.

Eknath Shinde
ShivSena Case : सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी घामच फोडला, ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी; नेमकं काय घडलं?

कायदा काय सांगतो?

महापालिकेतील सत्ताधारी केवळ बहुमताच्या आधारे नगरसेवकांना अपात्र ठरवू शकत नाहीत. ते अपात्रतेच्या संदर्भात केवळ प्रस्ताव मंजूर करू शकतात. हे प्रस्ताव जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांकडे दिला जातो. अथवा राज्य सरकारला पाठवला जातो. त्याबाबत नगरविकास विभागाकडून निर्णय घेण्यात येतो. नगरसेवकांची कृती खरचे घटनाविरोधी आहे की याची चौकशी केली जाते. नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्यास वेळ दिला जातो. त्यानंतर चौकशीअंती यावर निर्णय घेतला जातो.

Eknath Shinde
BJP News : भाजपच्या माजी नगरसेवकाची प्लंबरला रॉडने मारहाण? गुन्हा दाखल; पैशांच्या वादातून कार्यालयातच राडा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.