

Eknath Shinde News : विधान परिषदेच्या तब्बल 17 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हे 17 आमदार विजयी होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. महायुती होणार की नाही याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठा डाव टाकण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी उमेदवारी निश्चित करण्यात केली आहे. विप्लव बाजोरिया यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. या विषयी एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
बाजोरीया यांची उमेदवारी आज किंवा पुढील दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यत आहे. ते कामाला लागले असून महायुतीमधील नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेण्यास त्यांनी सुरवात केली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर जात बाजोरीया यांनी भेट घेतली.
विप्लव बाजोरिया यांनी या आधी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. ते मुळचे अकोल्याचे आहेत. त्यांचे वडील, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अमरावती स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघावर दावा सांगितला आहे. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. याआधी त्यांनी तिनदा अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
महायुतीचे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये देखील वर्चस्व आहे. त्यामुळे महायुतीमधील पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुरेसे संख्याबळ स्थानिक स्वराज संस्थांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे महायुतीमधील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार की बिनविरोध निवडणूक होणार याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.