Eknath Shinde News : केंद्रात जाणार की राज्यात थांबणार? यावर शिंदेंनी लगेचच दिले 'हे' उत्तर; म्हणाले...

Political News : एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले. त्यासोबतच महायुतीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ते केंद्रात किंवा राज्यात सत्तेत कोणते पद घेणार, याची उत्सुकता लागली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ? याची उत्सुकता लागली असतानाच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले. त्यासोबतच महायुतीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ते केंद्रात किंवा राज्यात सत्तेत कोणते पद घेणार, याची उत्सुकता लागली आहे. (Eknath Shinde News)

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाबाबात दावा करण्यात आल्याच्या बातम्या समोर आले होते. दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) केंद्रात जाण्याची ऑफर दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या सर्व घडामोडीवर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले. केंद्रात जाणार की राज्यातच राहणार, या प्रश्नाचे उत्तर शिंदे यांनी प्रसार माध्यमांना लगेचच उत्तर दिले. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर गुरुवारी महायुतीमधील तीन घटक पक्षाची बैठक होत आहे. अमित शहांसमोर तिन्ही पक्षांची बैठक आहे. त्याच्यासमोर चर्चा होईल. त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

CM Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे सत्तेपासून दूर राहणार; भाजपच्या ऑफरला दाखवली केराची टोपली; उपमुख्यमंत्रिपदासाठी दोन नावं सूचवणार

राज्यात काम करीत असताना राज्यातील जनतेचे प्रेम मिळाले. सख्खा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली. हे कमी नाही. मी ज्या काही योजना आणल्या. त्या मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले, ते त्यांना माहीत आहेत. त्यांचा हा मोठेपणा आहे, असेही यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी सांगितले.

CM Eknath Shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना अमित शाह यांचा फोन, नेमकं काय झाली चर्चा?

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून मी वर्षा निवासस्थानीच होतो. सगळ्यांना भेटतही होतो. मलापण भाजपने अडीच वर्षे पाठिंबा दिला होता ना? आता महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. त्यांच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आता त्यांचा निर्णय आहे. महायुतीचा जो असेल त्याला पाठिंबा देण्यासाठी बसलोय, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आता आम्हाला चांगलं महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे. महायुती मजबुतीने काम करणार आहे. उद्या आमची दिल्लीला अमित शहांसमोर बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांची बैठक असेल, त्यांच्यासमोर चर्चा होईल. त्यात निर्णय होईल.

CM Eknath Shinde
Eknath Shinde : कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही अन् विचारही; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

मी काल मोदी, शाह यांच्याशी फोनवर बोललो. सरकार स्थापन करण्यात कुठलाही अडथळा नाही. जो वरिष्ठ निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. उद्या अमित शहांसोबत बैठक आहे. त्यात जी चर्चा होईल, निर्णय होईल, असेही शिंदेनी स्पष्ट केले.

दोन दिवसापासून मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा असताना त्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. माझी शुक्रवारी पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा महायुतीला पाठिंबा असणार असल्याचे बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व जी भूमिका घेईल, त्याला संपूर्ण पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

CM Eknath Shinde
Eknath Shinde: "मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर मला 'हे' पद द्या अन् श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा..!" शिंदेंच्या नव्या गुगलीने भाजप बुचकळ्यात?

पीएम मोदींना मंगळवारी मी फोन करून सांगितलं आहे की, जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे. मोदींना आणि अमित शहांनाही हेच सांगितले आहे. तुमच्या निर्णयाला महायुतीमधील घटक पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गटाचा संपूर्ण पाठिंबा, असेल अशी घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.

CM Eknath Shinde
Rohit Pawar : कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांनी सभा का नाही घेतली? रोहित पवारांनीच सांगितलं कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com