

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरेंच्या दोन खासदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावून घेतलं आहे. यावेळी ठाकरेंच्या सर्व आक्षेपांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे. पण असं असलं तरी खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षाला संसदेत पहिला मोठा धक्का बसणार आहे. एका नियमामुळं त्यांची हक्काची जागा जाणार आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोणाचे किती खासदार निवडून येतात यावरच खरी शिवसेना कोणती हे ठरणार होतं. यामध्ये सहाजिकच उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली होती. कारण या निवडणुकीत एकनाथ शिंदेंकडून असलेल्या शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले होते तर ठाकरेंकडं असलेल्या शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले होते. त्यामुळं महाविकास आघाडीमध्येही उद्धव ठाकरेंचं वजन होतं. लोकसभेतही त्यांना पक्षाचं कार्यालय देण्यात आलं होतं.
पण आता याच ९ खासदारांपैकी दोन तृतीयांश अर्थात ६ खासदार फुटल्यानं आणि त्यांनी शिंदेसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्यानं आता मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण ठाकरेंचं लोकसभेतील हे कार्यालय काढून घेतलं जाणार आहे. कारण नियमानुसार, एखाद्या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून किमान ५ खासदार असणं गरजेचं आहे. तरच त्यांना एक कार्यालय दिलं जाऊ शकतं. पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेमध्ये केवळ ३ खासदार उरले आहेत.
यामध्ये राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचा सामावेश आहे तर राज्यसभेमध्ये संजय राऊत एकटेच आहेत. त्यामुळं दोन्ही सभागृहात मिळून ४ खासदार होतात. त्यामुळं आता शिवसेनेचं हे कार्यालय आज काढून घेतले जाण्याची शक्यता. आजच्या भेटीत ओम बिर्ला याबाबत त्यांना माहिती देऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.