

Kolhapur news : महायुतीने कोल्हापुरचा अन् महाराष्ट्राचा अपमान केला. 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार 25 संचालकांनी मतदान करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासन नियुक्ती संदर्भात आंम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत कोणती कल्पना दिली, याबाबत विचारणा केली. सोमवारी रात्री 11 वाजता शासन नियुक्त संचालकांना नोटीस दिली. सात दिवसपूर्वी नोटीस द्यावी असा कायदा होता, मात्र ही निवडणूक आमच्यावर लादली गेली. महायुतीने कोल्हापुरचा अन् महाराष्ट्राचा अपमान केला, कोर्टाकडून न्याय मिळेल, असे मोठे विधान 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीनंतर बोलताना सतेज पाटील यांनी केले.
समविचारी पॅनेलचे प्रमुख व आमदार सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीनंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी महायुतीच्या कारभारावर टीका केली. या निवडणुकीत आम्हाला गाफिल ठेवून काहीतरी वेगळं घडवायचं होते. मुख्यमंत्री यांनी एक वेगळं बोलणं, आणि धनंजय महाडिक (Dhanajay Mahadik) यांनी वेगळं बोलायचं यावरून कळले आहे. कोरम हा विषय पुढे आणला गेला, फक्त गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी चार लोकांची नियुक्ती करण्यात आली, अशी टीकाही सतेज पाटील यांनी केली.
कोल्हापूरच्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने महायुतीच्या नेत्यांमध्ये जिव्हारी लागले आहे. राज्यातील सामान्य मानून या मोर्चात सहभागी झाले होते. विषय कोरमचा नव्हता तर त्यांना सत्ता मिळवायची होती. गोकुळ ताब्यात घेण्यासाठी आदेश काढला. जनतेतील बहुमत असून तो डावलून तुम्ही सत्तेत आला, आम्हाला आता न्यायालयीन लढा द्यावा लागला. सोशल मीडियावर मला ट्रोलिंग करण्याचं काम सुरु आहे. एका संचालकांच्या चॅनेलच्या ऑफिस मध्ये बसून हा प्रकार सुरु आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
तीन महिन्यानंतर चार शासन नियुक्त संचालकाचा राजीनामा घेतला जाणार
गोकुळमध्ये जे चांगले आहे, त्याला पाठिंबा द्या. जे वाईट होईल त्याला विरोध होणारच आहे. येत्या तीन महिन्यानंतर चार शासन नियुक्त संचालक राहणार नाहीत. त्यानंतर यांचा राजीनामा घेतला जाणार आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पराभव झालेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सतेज पाटील (Satej patil) यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.