

Kolhapur News : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत समविचारी पॅनेलचे प्रमुख व आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यावर सडकून टीका केली. दहा वर्षांपासून चंद्रकांत पाटील आणि आमची लढाई सुरु आहे. स्वर्गीय डी. वाय दादांच्यावर बोलणी कितपत योग्य, यावर तुम्ही चिंतन करावे. चंद्रकांत पाटील आता तुमचा काचेचा बंगला आहे. सरकारी यंत्रणेत राहून धमकी देऊ नका. मी पाटील आहे, लढायचं असेल तर मैदानात या, विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढूया. मला संपवतो, उद्धवस्त करतो ही धमकी देत असाल तर सरकारी यंत्रणेचा वापर का करता असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना केला.
महायुतीने बहुमताचे अनादर करून पाप करू नये. मंत्री मुश्रीफांचे ऑडियो क्लिप बाहेर काढली तर शासनाची व्यवस्था आम्ही कशी वापरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. राज्यात कोणताही अध्यादेश काढून कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो. न्यायालयीन लढाईत आम्हाला यश मिळेल, असा दावा सतेज पाटील (Satej patil) यांनी केला.
धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik) यांनी निवडणूक २०२७ असो व २०२९ ची त्यावेळी निर्णय घेईन. सारिपाटावरचे डाव कसे खेळतात हे मला चांगलं ठाऊक आहे. धनंजय महाडिक तुम्ही स्वतःच्या कारखान्यावर जाऊन या. त्याठिकाणची बिल थकवली आहे, साखर जप्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उगीच समोरच्यावर बोट धरू नका, अशी टीका त्यांनी केली.
गोकुळमध्ये जे चांगले आहे, त्याला पाठिंबा द्या. जे वाईट होईल त्याला विरोध होणार. तीन महिन्यानंतर चार शासन नियुक्त संचालक राहणार नाहीत. त्यानंतर यांचा राजीनामा घेतला जाणार आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पराभव झालेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.