Raju Shetti Statement: '2004 ते 2014 या कालावधीत गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये होणारी घुसमट मी जवळून पाहिलीय..; शेट्टींचा परळीमधून गौप्यस्फोट

Raju Shetti On Gopinath Munde: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी हे परळी येथे प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'सरकारनामा'शी बोलताना त्यांनी अनेक उदाहरण दिले आहेत. ज्या घटनांमुळे गोपीनाथ मुंडे हे पक्षात असताना अस्वस्थ झाले होते. याचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून राजू शेट्टी यांनी माहिती दिली.
Raju Shetti On Gopinath Munde
Raju Shetti On Gopinath Munde Sarkarnama
Published on
Updated on

Parli News: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपकड़ून चव्हाण यांचा दावा खोडून काढतानाच त्यांच्यावर टीकेची झोडही उठवण्यात आली आहे. यातच शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2004 ते 2014 या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षात होणारी घुसमट मी जवळून पाहिली होती, असा गौप्यस्फोट केल्यामुळे आता एकप्रकारे काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यालाच हवा मिळाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी हे परळी येथे प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'सरकारनामा'शी बोलताना त्यांनी अनेक उदाहरण दिले आहेत. ज्या घटनांमुळे गोपीनाथ मुंडे हे पक्षात असताना अस्वस्थ झाले होते. याचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून राजू शेट्टी यांनी माहिती दिली.

1995 साली असलेल्या युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी तर उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. त्यावेळी झोन बंदी संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन सुरु केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झोनबंदी संदर्भात समिती नेमली होती. त्यामुळे वारंवार मंत्रालयातील बैठकांसंदर्भात मी मुंडे यांच्याजवळ उपस्थित असायचो. त्यामुळे गोपीनाथ मुंडे आणि माझे घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

पुढे दहा वर्षांत मी आमदार म्हणून निवडून आलो. या पाच वर्षांच्या काळात मला गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत वेळ घालवता आला. शिवसेना फुटल्यानंतर विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ कमी झाले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं. मी अपक्ष आमदार असल्याने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते अधिक मैत्रीपूर्ण वागत असत. त्यावेळी पक्षातील काही अंतर्गत घटना माझ्यासोबत बोलून दाखवल्या होत्या.

Raju Shetti On Gopinath Munde
BJP New Team: भाजपच्या नव्या टीममधून दिग्गजांचं कमबॅक : वसुंधराराजे, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर यांच्यासह 3 माजी मुख्यमंत्री अन् 10 माजी मंत्री मैदानात

ते आमदार असताना त्यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला होता. पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांमुळे त्यांची नाराजी होती. केवळ सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता सर्व आमदारांनी मुंडे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतरच्या काळात आम्ही दोघेही खासदार झालो. त्यामुळे संसदेमध्ये आम्ही एकत्र कामं केलं. पण पक्षांसंदर्भात त्यांची अस्वस्थता आणखी वाढली होती. पण एक तसुभरही पक्षाच्या कामात त्यांनी हलगर्जीपणा दाखवला नाही. त्याचा साक्षीदार मी स्वतः असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मी महायुतीचा घटक होतो. त्यावेळी सुद्धा मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना महाराष्ट्रभर दौरे केले आहेत. त्यावेळी पहिली सभा इचलकरंजी येथे घेण्यासाठी मुंडे यांनी माझ्याकडे शब्द टाकला होता. तर दुसरी सभा बीड येथे झाली होती. 2014 नंतर मोदी सरकार आणण्यासाठी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. तितकाच वाटा गोपीनाथ मुंडे यांचा देखील होता. राज्यासह देशभरात युतीचे सरकार आले.

Raju Shetti On Gopinath Munde
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदी निवड होताच गिरीश महाजन म्हणाले : ‘मला आज पांडुरंग पावला...’

2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना सुरू होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात गोपीनाथ मुंडे यांना मोदी सरकारच्या शिष्टमंडळाकडून संपर्क होईल, अशी अपेक्षा होती. शपथविधीला देखील तात्काळ आमंत्रण मिळेल, असा विश्वास मुंडे यांना होता.

मात्र, बराच कालावधी लोटाला पण निरोप न आल्याने मुंडे यांची अस्वस्था वाढली होती. ती अस्वस्थता मी जवळून पाहिली. त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या. शेवटी त्यांची सहनशक्ती संपली होती. त्यांच्या संयमाचा अंत पाहिला आणि शेवटच्या क्षणी त्यांना निरोप देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com