Sudhir Khode Suspended : गटशिक्षण अधिकारी सस्पेंन्ड, पेपरफूटीमध्ये राजकीय कनेक्शन?

Paper Leak Case : पेपरफुटी प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
 Suspended
Suspendedsarkarnama
Published on
Updated on

Sudhir Khode News : दहावीच्या पेपर फूटी प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. पेपरफूटीमागे राजकीय कनेक्सन असल्याची शक्यता वर्तवली जात असून एका गटशिक्षण अधिकाऱ्याला सस्पेंन्ड करण्यात आले आहे. सुधीर खोडे असे सस्पेंन्ड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये दहावीच्या परीक्षेच्या दरम्यान इंग्रजी आणि उर्दु भाषेच्या दोन उत्तर पत्रिका परीक्षा केंद्रातून गायब असल्याचे लक्षात आले. फरारी पथकाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी या विषयी जाब विचारला. मात्र, त्याचे उत्तर गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांना देता आले नाही.

दरम्यान, एक व्यक्ती स्वतःच्या शर्टाच्या आतमध्ये लपवून त्या उत्तरपत्रिका पुन्हा घेऊन आत आणून ठेवत असताना पकडला गेला. यानंतर एका अल्पवयीन विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकाला ताब्यात घेण्यात आले. एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या मुलाने घरीचे पेपर सोडवून या उत्तर पत्रिका दिल्याचे तपासात आढळून आले.

 Suspended
Devendra Fadnavis News: फडणवीस, गडकरींसोबतचा अनुभव पुण्यात काम करताना उपयोगी ठरेल!

यामध्ये गटशिक्षणअधिकारी खाडे यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सुधीर खोडे याच्यासह उपपर्यवेक्षक आणि अन्य संबंधितांसह पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची दाखल करण्यात आला होता. आता थेट खोडे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

तपास सुरू...

पोलिसांनी दोन विद्यार्थ्यी आणि एका पालकाला ताब्यात घेतले होते. यातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे वडील हे प्रतिष्ठीत राजकीय व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कुणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.

 Suspended
Satara Politic's : अविनाश मोहितेंनी ‘कृष्णा’साठी डाव टाकला : नेतृत्वाची धुरा बदलणार; सत्ताधारी भोसले गटही सावध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com