Haffkine : हाफकिनच्या हातून तब्बल 440 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट निसटले; खासगी कंपनीसाठी कुणाची फिल्डिंग? जयंत पाटलांना वेगळाच संशय

Jayant Patil Demands High Level Inquiry Into Haffkine Tender : हाफकिनमधील काही अधिकारी खासगी कंपन्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा संशय आता समोर येत असून याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jayant Patil Tender Probe News : राज्यातील सार्वजनिक औषधनिर्मिती क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडला केंद्र सरकारच्या सुमारे ४४० कोटी रुपयांच्या पोलिओ लसपुरवठ्याच्या निविदेतून बाहेर पडावे लागले आहे. तांत्रिक निकषांची पूर्तता न झाल्याने हाफकिनची निविदा अपात्र ठरविण्यात आली असून, या पुरवठ्याचे कंत्राट खासगी कंपनीला मिळाले आहे. या प्रक्रियेत हाफकिनचे जाणीवपूर्वक नुकसान करण्यात आल्याचा संशय व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हाफकिनमधील काही अधिकारी खासगी कंपन्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा संशय आपण पावसाळी अधिवेशनात व्यक्त केला होता, असे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये हाफकिनने एका खासगी कंपनीला मागे टाकत सुमारे २०० कोटी रुपयांची पोलिओ लसपुरवठ्याची ऑर्डर मिळवली होती.

मात्र, त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत, जुलै २०२६ मध्ये केंद्र सरकारच्या ४४० कोटी रुपयांच्या निविदेत महामंडळ अपात्र ठरले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रमाणपत्राचे नूतनीकरण आणि आवश्यक तांत्रिक पूर्तता न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Jayant Patil
Jayant Patil News: "ही टेस्टट्युब बेबी मागे घ्या! अशी रेटारेटी केली तर..."; गोकुळच्या निर्णयावर जयंत पाटलांची सरकारला कळकळीची विनंती

विशेष म्हणजे, खासगी कंपनीला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी हाफकिनला जाणीवपूर्वक निविदा प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आले का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मार्च २०२७ नंतर महामंडळाला पुरेशा लस उत्पादनाच्या ऑर्डर्स मिळाल्या नाहीत, तर उत्पादन प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम महामंडळात कार्यरत असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर होऊ शकतो. त्यामुळे केवळ निविदेतील अपात्रतेची चौकशी न करता महामंडळाचे उत्पादन आणि रोजगार टिकविण्यासाठीही शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Jayant Patil
Jayant Patil : जिल्हा बँकेच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले : पडळकरांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या नेत्यानेही जयंत पाटलांना घेरलं; घोरपडेंचा थेट आरोप

दोषींवर कारवाई करा!

हाफकिनचे आर्थिक नुकसान करून खासगी कंपन्यांना फायदा मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर शिस्तभंगाची तसेच फौजदारी कारवाई करावी आणि मार्च २०२७ नंतरही महामंडळाचे लस उत्पादन सुरू राहण्यासाठी आवश्यक उत्पादनाच्या ऑर्डर्स उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.