Harshwardhan Sapkal : राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट? अनेक बडे नेते काँग्रेसच्या वाटेवर; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता

Harshwardhan Sapkal's statement News : भविष्यकाळात काँग्रेसमध्ये अनेक मोठे नेत्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत, असा दावा त्यांनी केल्याने आगामी काळात काहीतरी मोठे घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan SapkalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा केंद्रस्थानी आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भविष्यकाळात काँग्रेसमध्ये अनेक मोठे नेत्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत, असा दावा त्यांनी केल्याने आगामी काळात काहीतरी मोठे घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता असून सपकाळांच्या या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvrdhan Sapkal) रविवारी पुणे दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यातील सर्वच पक्षाकडून आतापासूनच 2029 सालच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु आहे. आगामी काळात होत असलेल्या या निवडणुका डोळयांसमोर ठेवून अनेक नेतेमंडळी सोयीच्या राजकीय पक्षात उडी मारू शकतात. यावरच बोलताना, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठ पक्ष प्रवेश होतील. मोठी वेटिंग लिस्ट आहे. कोणाला पक्षात घ्यायचे ते आम्ही ठरवू.'

काँग्रेसमध्ये (Congress) लवकरच अनेक बाहुबली नेत्यांचा प्रवेश होणार असल्याचे गुपित काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फोडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश नेमका कोणाचा असेल, कोणता नेता काँग्रेसमध्ये उडी मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Harshvardhan Sapkal
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

येत्या काळात शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत जाऊ शकतो, हा गट मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयकालाही पाठिंबा देऊ शकतो, असा दावा केला जात आहे. यावर बोलताना, देशात 50 टक्के आरक्षण काँग्रेसनेच आणले. 2029 सालापासून महिला आरक्षण विधेयक लागू करा ही काँग्रेसची मागणी आहे. मात्र आरक्षणाच्या नावाखाली डिलीमीटेशन बिल आणण्याचा भाजपचा डाव आहे. इंडिया आघाडीतील सगळे पक्ष याला विरोध करणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या सोबतच भाजपची पाठराखण करताना मित्रपक्षांनी विचार करावा, असा सल्लाही सपकाळ यांनी यावेळी दिला. आम्ही भाजपासोबत जाणार नाही, असे सुप्रिया सुळेंनी याआधी सांगितले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Harshvardhan Sapkal
Congress news : मला काँग्रेसमध्ये परत यायचंय, माफ करा! विरोध होताच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीने जोडले हात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.