
Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमचे भांडण शुल्लक आहे. एकत्र येणे आणि एकत्र राहणे ही कठीण गोष्ट आहे, असे वाटत नाही. मात्र, हा माझा एकट्याचा विषय नाही, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केल्यानंतर अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला. असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमी वरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, बाप पळवणारा आमचा विचार नाही आणि पोरे पळवणारी आमची गँग नाही. आम्ही भारत जोडो वाले आहोत; त्यामुळे दोन परिवार एकत्र येत असतील, तर त्यात कुठेही आक्षेप नाही, असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "भाजप हा महाराष्ट्रधर्माच्या विरोधात आहे. हा विचार महाराष्ट्राचे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. भाजप आपल्याला संस्कृती आणि भाषेपासून तोडत आहे. भाजपचा विचार हा महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याच्या अनुषंगाने आहे, याच सांगण्यातून राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) विचारांतून दुजोरा मिळतोय."
"राज ठाकरेंची भूमिका हा इशारा आहे. राज ठाकरेंचा भ्रमनिरास भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून झाला असावा. आम्ही 'भारत जोडो'वाले आहोत. आम्ही कुटुंब फोडणारे नाहीत. बाप पळवणारा आमचा विचार नाही आणि पोरे पळवणारी आमची गँग नाही. आम्ही भारत जोडो वाले आहोत; त्यामुळे दोन परिवार एकत्र येत असतील, तर त्यात कुठेही आक्षेप नाही. जोडले जात असतील, तर स्वागत आहे," असे सपकाळ यांनी सांगितले.
राज ठाकरेंचं महाविकास आघाडीत स्वागत आहे का? असा प्रश्न विचारल्यावर सपकाळ यांनी म्हटले, "राज ठाकरेंकडून प्रस्ताव यथावकाश आल्यास आमचा प्रतिसाद राहिल."
'कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद आमच्यातील भांडणे हे अत्यंत किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही.
पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे. हा माझ्या काही एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहिला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केले पाहिजे असे मला वाटते,' असे राज ठाकरेंनी म्हटले होते.
"मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणे ( तुम्ही बाहेर गेल्यानंतर कळेल किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे) बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना मराठी व महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. पण माझी अट एक आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही हे लोक महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे हे लोक गुजरातला घेऊन जात होते. तेव्हाच तुम्ही विरोध केला असता तर आज हे सरकार तिकडे (दिल्लीत) बसले नसते. तिथे आम्ही महाराष्ट्राच्या हिताच्या विचार करणारे सरकार केंद्रात बसवले असते.
राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या विचार करणारे सरकार बसले असते. त्याचवेळी हे काळे कामगार कायदे कचऱ्याच्या पेटीत फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असे चालणार नाही," असे विधान उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.