

Gokul News : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपात मागील राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. अशातच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्या नाट्यानंतर जे काही घडलं त्याचा खुलासा करत मंत्री मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुश्रीफ म्हणाले, 'अरुण डोंगळे राजीनामा देण्यासाठी टाळाटाळ करत होते. तेव्हा कोणाला अध्यक्ष करावे. याबाबत माजी आणि सतेज पाटलांची चर्चा झाली होती. त्यावेळेस सतेज पाटील यांनी बाबासाहेब चौगुले यांचं नाव सांगितलं होतं. त्या वेळेस त्यांनी शशिकांत पाटील चूयेकर यांचं नाव सांगितलं नव्हतं.'
पुढे बोलताना ते म्हणाले,'मला बाबासाहेब चौगुलेला अध्यक्ष करायचं आहे, असं ते म्हणाले होते. पण शशिकांत पाटील यांना अध्यक्षपद दिलं तरच अरुण डोंगळे राजीनामा देतील असं मी सांगितल्यानंतर चुयेकर यांचं नाव पुढे आलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तरच मी राजीनामा देईन, अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली.',
'यावर तोडगा म्हणून माझ्या मुलाचं नाव मुंबईत ठरले. त्यामुळे सतेज पाटील यांनी माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठे?आमच्याकडे बहुमत आहे, असे सतेज पाटील म्हणत आहेत मग आमची गरज तुम्हाला का वाटत आहे. आम्ही कुठे आडव आलोय? उपस्थित न राहण्याच स्वातंत्र्य आम्हाला आहे की नाही.', असा प्रश्न देखील त्यांनी केला.
'माझं बोट धरून त्यांनी मला गोकुळला नेलं आहे. तीन मंत्री दोन खासदार दहा आमदार यांना त्यांनी बांधलं आहे. इतक्या मोठ्या माणसावर मी काय बोलणार? असा खोचक टोला लगावत मंत्री मुश्रीफ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केल्यानंतर अध्यक्ष निवड कशी होऊ शकते. ते लोक अशा गोष्टी करत आहेत हे दुर्दैवी आहे. त्यांनी कायदेशीर मार्गानेच पुढे गेलं पाहिजे. लोकांच्यात संभ्रम निर्माण करू नये, असा सल्ला मंत्री मुश्रीफ यांनी दिला.
शशिकांत पाटील यांना भविष्यात म्हणजे या पाच वर्षात किंवा पुढील पाच वर्षात अध्यक्ष आम्हीच करू असं मी म्हणालो आहे. आता संचालक फोडाफोडीचा विषय नाही. आता कायद्याचा विषय आहे. 14 लोक त्यांना कोरम पूर्ण करण्यासाठी लागतील आणि कोरम पूर्ण झाल्याशिवाय अध्यक्ष होणार नाही. सतेज पाटील आणि मी आमच्या मैत्रीची जी अग्नी परीक्षा द्यावी लागणार होती ती आम्ही दिली आहे. असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.