Maharashtra Schools News: 757 शाळांना मोठा दिलासा! राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

Bombay High Court News: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने 757 शाळांना अनुदानासाठी अपात्र ठरवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. वैयक्तिक सुनावणीशिवाय कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहे.,
High Court Stays Maharashtra Government's Decision on 757 Schools
High Court Stays Maharashtra Government's Decision on 757 SchoolsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Schools News: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महाराष्ट्र सरकारच्या 757 शाळांना अनुदानासाठी अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने या निर्णयाला अंतरिम स्थगिती देत संबंधित शाळांवर कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे. शाळांना वैयक्तिक सुनावणीची संधी दिल्याशिवाय पुढील कारवाई करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सरकारला दिले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने 1 आणि 2 एप्रिल 2026 रोजी दोन शासन निर्णय जारी केले होते. या निर्णयांनुसार राज्यातील 433 प्राथमिक आणि 324 माध्यमिक अशा एकूण 757 शाळांना अनुदानासाठी अपात्र घोषित करण्यात आले होते. या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी माध्यमाच्या तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांचा समावेश होता.

सरकारच्या या निर्णयामुळे संबंधित शाळांना स्वनिधीवर चालवावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. अनेक शाळांना आर्थिक अडचणींमुळे बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक संघटनांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

High Court Stays Maharashtra Government's Decision on 757 Schools
Maharashtra Teacher Recruitment News: रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर गती; पवित्र पोर्टलसाठी नवी मुदतवाढ

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती माधव जे. जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण एस. पाटील यांच्या खंडपीठाने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाळांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता घेतलेला निर्णय हा नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

High Court Stays Maharashtra Government's Decision on 757 Schools
Dr Nitish Raut: दादर ते ब्रिटनचे महापौर! मराठी डॉक्टर नितीश राऊत यांची मोठी झेप

न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, एकीकडे सरकार मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे मराठी माध्यमाच्या अनेक शाळांवर गंडांतर आणणारे निर्णय घेत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा गंभीर परिणाम होऊ शकतो, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

High Court Stays Maharashtra Government's Decision on 757 Schools
Maharashtra Government News: शिक्षकांनो सावधान! ‘हे’ कार्ड नसेल तर मेडिकल बिल अडकणार

खंडपीठाने याचिकाकर्त्या शाळांची नावे अपात्र शाळांच्या यादीतून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, वैयक्तिक सुनावणी पूर्ण होईपर्यंत या शाळा पूर्ववत सुरू राहतील आणि त्यांच्यावर कोणतीही जबरदस्तीची कारवाई करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com