
हिराली फाउंडेशनच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ती सरिता खानचंदानी यांनी सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यांच्या निधनाने उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली असून समाजात शोककळा पसरली आहे.
Ulhasnagar News : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या गाड्याचे सायलंसर आणि डीजे विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांच्या बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केलीय. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. त्यांनी अनेकदा जल प्रदूषणासह विविध सामाजिक समस्याविरोधात प्रखर लढा दिला होता. त्या हिराली फाउंडेशनच्या प्रमुख होत्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या उल्हासनगरसह राज्यभर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. अशातच उल्हासनगर हादरले. गुरूवारी (ता.28) दुपारच्या वेळी आपले काम संपवून खानचंदानी आपल्या घरी पोहचल्या होत्या. त्यांचे घर कॅम्प 4 परिसरातील विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनसमोर असणार्या रोमा अपार्टमेंट 7 व्या मजल्यावर आहे.
येथे त्यांनी दुपारी इमारतीच्या टेरिसवर बसून प्रार्थना केली आणि थेट खाली उडी मारली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने हे उघड झाले. त्यानंतर त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला.
पेशाने वकील असलेल्या सरिता यांनी अनेक सामाजिक प्रश्नांविरोधात लढा उभारला होता. त्या गेली अनेक वर्षे नदी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण, कर्कश आवाजाविरोधात तसेच बेकायदेशीर होर्डिंग संदर्भात सतत आवाज उठवत होत्या.
पण इतक्या लढवय्या असणाऱ्या, पेशाने वकील असलेल्या सरिता यांनी असे आत्महत्येचं पाऊल का उचलेले? त्यांचा कोणाशी वाद झाला का? याचा तपास आता विठ्ठलवाडी पोलिस करत असून सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे.
प्र.१. सरिता खानचंदानी कोण होत्या?
उ. त्या हिराली फाउंडेशनच्या प्रमुख होत्या आणि जल व ध्वनी प्रदूषणाविरोधात तसेच विविध सामाजिक समस्यांवर लढा देत होत्या.
प्र.२. त्यांचा मृत्यू कसा झाला?
उ. त्यांनी सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्र.३. या घटनेचा परिणाम काय झाला?
उ. या घटनेने उल्हासनगर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.