IMD Weather Alert : शेतकरी अडचणीत, ऐन उन्हाळ्यात गारपीठ अन् वादळी पावसाचा अंदाज, हवामान विभागाच्या इशाऱ्याने प्रशासन सतर्क

Farmers Face Concern Weather Alert : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजमुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना रब्बी पीक वाया जाण्याची भीती सतावते आहे.
Unseasonal rain and hailstorm forecast from March 17–20 raises concern among farmers.
Unseasonal rain and hailstorm forecast from March 17–20 raises concern among farmers. sarkarnama
Published on
Updated on

Weather Update : राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो.

18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात रब्बीचे पीक हातात आले तर त्यांना मोठा दिलासा मिळणार होता. मात्र, 17 मार्च पाऊस वादळी पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही ठिकाणी रब्बीच्या पिकाची काढणी सुरू आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर हे पीक सुरक्षीत ठिकाणी ठेवण्याचे काम शेतकऱ्याकडून सुरू आहे.

Unseasonal rain and hailstorm forecast from March 17–20 raises concern among farmers.
Dhule Murder Case : धुळे जिल्ह्याला हादरवणाऱ्या खुनाचा निकाल, माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेप

कर्जमाफीची प्रतीक्षा

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफीचे निकष काय असणार यावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

Unseasonal rain and hailstorm forecast from March 17–20 raises concern among farmers.
Jalna bribery case : पंचायत समितीत भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धुमाकूळ; बिलं मंजूरीसाठी थेट गटविकास अधिकाऱ्यासमोरच पैशांचा व्यवहार, धक्कादायक VIDEO आला समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com