Jalna News, 13 Mar : राज्यातील सरकारी कर्मचार्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रंचंड नाराजी वाढत असतानाच जालना जिल्ह्यातून आणखी एक असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जालन्यातील जाफराबाद पंचायत समिती कार्यालयातच बिलं मंजुरीसाठी पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी देयक मंजूर करण्यासाठी पैसे घेतल्याचा हा व्हिडिओ आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम पंचायत समितीमधील गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात गट विकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे ही घटना उघडकीस येताच प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नाली बांधकाम तसेच सभागृहातील फरशी बसवण्याची कामे करण्यात आली होती. या कामांचे देयक मंजूर करण्यासाठी संबंधितांकडून विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी पैसे घेतले.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेतली. जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक चौकशीच्या पार्श्वभूमीवर विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पंचायत समिती कार्यालयातच अशा प्रकारे पैशांची देवाणघेवाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी कार्यालयात अशा घटना घडत असल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.