Assembly Session 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्याच्या प्रश्नावरून धाराशीव-कळंबचे आमदार कैलास पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. धाराशीव शासकीय वैद्यकीय रुग्णालय-महाविद्यालयात कोट्यावधी रूपये खर्चून कॅथलॅब तयार करण्यास मंजूरी देण्यात आली. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तरी ही कॅथलॅब अद्याप कार्यान्वित झालेली नाही.
यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे आमदार कैलास पाटील सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मंजुरी झाली, निधी मिळाला तरी कॅथलॅब बंद का? असा सवाल उपस्थित करत हृदय रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्टोबर 2023 मध्ये तब्बल 18 कोटी रुपये खर्चून कॅथलॅब उभारण्यास मंजुरी देण्यात आली. एक वर्षात काम पूर्ण करण्याची अट असतानाही आजतागायत कॅथलॅब कार्यान्वित झालेली नाही. या निष्क्रियतेमुळे धाराशिव जिल्ह्यातील हृदयरुग्णांना उपचारासाठी सोलापूरसारख्या बाहेरील जिल्ह्यांत जावे लागत आहे.
वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. कॅथलॅब सुरू करण्यासाठी आवश्यक रोहित्र आणि जनरेटर खरेदीसाठी 2024 मध्ये जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, समितीच्या कामांवरील स्थगितीमुळे प्रक्रिया रखडली.
त्यानंतर सन 2025 ते 26 मध्ये पुन्हा निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तरीदेखील प्रत्यक्ष कामाची गती अत्यंत संथ आहे. कॅथलॅब अद्याप सुरू न होणे हे प्रशासनाचे गंभीर अपयश आहे. तात्काळ कॅथलॅब कार्यान्वित करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कैलास पाटील यांनी सभागृहात केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.