Vivek Kolhe : ''आरे ला, कारे करून उत्तर देण्यास तयार''; विवेक कोल्हेंचा विरोधकांना इशारा!

Ahmednagar politics : निवडणुका संपल्या की राजकारण संपले पाहिजे, असेही कोल्हे यांनी सुरुवातीलाच सांगितले.
Vivek Kolhe
Vivek KolheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाला. ''विरोधाला विरोध करून काम करणे ही आमची पद्धत नाही. आरे ला, कारे करून उत्तर देण्याची आमचीही तयारी आहे.'', असा इशारा विवेक कोल्हे यांनी विरोधकांना दिला.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न घेऊन, पुन्हा विजय मिळवण्यासाठी कोल्हे कुटुंब सज्ज असल्याचेही विवेक कोल्हे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vivek Kolhe
Tanaji Sawant News : मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो; मी सांगेल ते करायचे : तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य

विवेक कोल्हे यांनी भाषणाची सुरूवात निवडणुका संपल्या की राजकारण संपले पाहिजे, असे सांगून केली. ते म्हणाले, 'मतदान केले नाही म्हणून रस्ता अडवणे, डीपी अडवणे, विकासकामे रखडवणे ही पद्धत योग्य नाही. विरोध करून कोणी राजकारण केले, तर आपणही आरे ला, कारे करू शकतो. राजकारणाचे उत्तर राजकारणाने देऊ शकतो'.

तसेच आगामी काळात आपली भूमिका शेतकरी हितासाठी आग्रही असणार आहे. ज्यांचे शेतकऱ्यांवर लक्ष तो आपला पक्ष, हे धोरण राहणार असल्याचेही विवेक कोल्हे यांनी सांगितले.

याशिवाय, ''सहकार हितासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गणेश कारखाना निवडणूक लढलो आणि कारखाना सुरू झाला. आगामी काळात ज्या निवडणुका येतील त्यात खंबीरपणे तुमच्या सोबत उभे राहू. आगामी काळात पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. पाण्यासाठी न्यायालयीन लढाई कोल्हे कारखाना लढतो आहे. न्याय मिळाला नाही, तर रस्त्यावरची लढाईदेखील लढू. '' असंही त्यांनी सांगितले.

याचबरोबर ''मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तरी रस्ते, पाणी आणि वीज समस्या गावच्या विकसित होण्यात मोलाच्या असतात. त्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.'' असंही ते म्हणाले. याप्रसंगी गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते, गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे, धनंजय जाधव, रामचंद्र बोठे, राजेंद्र काळे, भानुदास कातोरे उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com