Land Scam : IAS अधिकाऱ्यापाठोपाठ आता तहसीलदाराचाही पराक्रम, अब्जावधींच्या जमिनी पळविल्या? बावनकुळेंकडून चौकशीचे आदेश

Chandrashekhar Bawankule On Land Scam : मुंबई एसईझेडच्या अब्जावधी रुपयांच्या जमिनी पळविल्याचा ठपका उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
land scam
land scamSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बीडमधील 241 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  2. या प्रकरणात त्यांना 15 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे.

  3. दरम्यान रायगडमध्येही एका तहसीलदारावर अब्जावधी रुपयांच्या जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाले असून महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Raigad News : बनावट आदेशाने 68 कोटी रुपयांचा भूसंपादन मावेजा 310 कोटी रुपयांवर नेऊन 241 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांना अटक केली आहे. त्यांना १५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली असतानाच आता रायगड जिल्ह्यात देखील एका तहसीलदारावर अब्जावधी रुपयांच्या जमिनी पळविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील मुंबई एसईझेडच्या अब्जावधी रुपयांच्या जमिनी पळविल्याच्या आरोपावरून उरण तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून आता बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्या अडचणी वाढल्या असून गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे. कदम यांच्यावर मुंबई एसईझेडच्या अब्जावधी रुपयांच्या जमिनी पळविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

उरण तालुक्यातील सन २०१० मध्ये हजारो एकर जमीन महा मुंबई एसईझेड या विशेष प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली. त्यावेळी या सर्व जमिनीवर मुंबई एसईझेडचे नाव चढवण्यात आले. त्यानंतर यात कोणताच बदल होणार नाही, जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कोणत्याही व्यक्तीचे नाव कोणत्याही परिस्थितीत लागणार नाही हे निश्चित झाले. मात्र उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी बेकायदेशिररित्या त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने त्या हस्तांतरित केल्या. या कामात त्यांना दलालांनी मदत केल्याचे कळत आहे.

land scam
land scam : ‘कल्याणी ग्रीन्स’ जमीन घोटाळ्यात तत्कालीन दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख उपअधीक्षकांसह 5 जणांना दणका; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

या दरम्यान या प्रकाराकडे मुंबई एसईझेडचे वकील ॲड. सागर जगे यांनी लेखी तक्रार करत अवॉर्ड पत्र सादर केले. तसेच लेखी हरकत नोंदविली, मात्र कदम यांनी यावर कोणतेच उत्तर दिले नाही. उलट रीतसर सुनावणी घेऊन कलम 236 अन्वये कायदेशीररित्या आदेश पारित केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. ज्यानंतर आता बावनकुळे यांनी कदम यांच्या चौकशीचे आदेश कोकण आयुक्तांना दिले आहेत. यामुळे कदम मोठ्या अडचणीत सापडले असून चौकशीनंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

तहसलीदार कदम यांनी मुंबई एसईझेड यांच्या नावांच्या जागी त्रयस्थ व्यक्तीचे नाव सातबारावर लावले आहे. तसेच त्यांनी १५ नोटीस पाठविल्या. जे बेकायदेशीर असल्याचे मुंबई एसईझेड उलवे येथील अधिकारी आणि लीगल टीमने स्पष्ट केले आहे. तसेच तहसलीदार कदम यांना जमिनीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तर तसा अधिकार महसूल न्यायाधिकरणाला नाही. तो फक्त सिव्हिल कोर्टाला असून येथे कदम यांनी सिव्हिल कोर्टाचे अधिकार वापरल्याचा दावा मुंबई एसईझेडने केला आहे.

दरम्यान आता तहसलीदार कदम यांनी मुंबई एसईझेडच्या अब्जावधी रुपयांची जमिनी अवैधरित्या हस्तांतरित करून कोट्यावधी रुपयांचा मलिदा जमविल्याची चर्चा जनमानसात आहे. तर कदम यांच्या या कारनाम्याविरोधात महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या चौकशीचा अहवाल पंधरा दिवसात करण्याचे निर्देशही कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

land scam
Ashok kharat land scam : 4 कोटींची जमीन 58 लाखांत लाटली; अशोक खरातचा नवा कारनामा उघड

FAQs :

1. अविनाश पाठक यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली?

भूसंपादन मावेजा 68 कोटींवरून 310 कोटींवर नेल्याच्या कथित 241 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अटक झाली.

2. न्यायालयाने काय आदेश दिले आहेत?

अविनाश पाठक यांना 15 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

3. रायगडमधील प्रकरण काय आहे?

रायगड जिल्ह्यात एका तहसीलदारावर अब्जावधी रुपयांच्या जमिनी पळविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

4. या प्रकरणात सरकारने काय पाऊल उचलले?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

5. पुढे काय कारवाई होण्याची शक्यता आहे?

चौकशी अहवालानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com