Bharat Gogawale : पालकमंत्रिपदावर भरत गोगावले यांची मिश्किल टिप्पणी; ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी...’

Bharat Gogawale On Raigad Guardian Minister Post : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे.
Bharat Gogawale on guardian minister post
Bharat Gogawale on guardian minister postSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : रायगडमध्ये पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. काहीच दिवसांपूर्वी आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर भाष्य करताना ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी अडवले होते. आपल्याकडेच ते राहावे म्हणून जोर लावला होता, असा आरोप केला होता.

यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनीदेखील पालकमंत्रिपदाबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांनी रायगड पालकमंत्रीपदाचं डिक्लरेशन घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागल्याचे म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या या मिश्किल टिप्पणीवरून आता कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पाहायला मिळाला होता. दरम्यान, नुकताच यावर महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेत रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ गोगावलेंच्या गळ्यात टाकली. या निर्णयानंतर आता रायगडमधील वाद थांबले, असे म्हटले जात होते.

Bharat Gogawale on guardian minister post
Bharat Gogawale : 'ते दुर्योधन, जे बोलतात त्याच्या उलटच घडतं’, संजय राऊतांवर बडा नेता बरसला; सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही भाष्य

मात्र वाद थांबण्याऐवजी आता पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवरून श्रेयवादाला तोंड फुटले आहे. यातच रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या वादाला नवं वळण आलं आहे. त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचं डिक्लरेशन घेण्यासाठी मला आग्र्याला जावं लागलं, असे म्हटले आहे. त्यांच्या या मिश्किल टिप्पणीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

रायगडचे पालकमंत्रिपद तब्बल पावणेदोन वर्षे रिक्त होतं. भरत गोगावलेंसह आदिती तटकरे यांनाही पालकमंत्रिपदावर दावा केला जात होता. तर यावरून राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठा संघर्ष झाला होता. पालकमंत्रिपदावरून शिंदेंचे शिलेदार विरुद्ध सुनील तटकरे असा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, हा वाद थांबवण्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत एक डील झाल्याची चर्चा रंगली होती. तिकडे अनिकेत तटकरे आमदार झाले आणि १५ ऑगस्टला गोगावले यांनी ध्वज फडकवला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अखेर भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली.

Bharat Gogawale on guardian minister post
Bharat Gogawale : ठाकरेंना पुन्हा हादरा? 'ऑपरेशन टायगर' बाबत शिंदेंच्या बड्या नेत्याचे संकेत; 'आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल'

पण आता हा संघर्ष रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीनंतरदेखील पाहायला मिळत आहे. नियुक्तीनंतर आमदार दळवी आणि तटकरे यांच्यात वाद सुरू झाला आहे. अशातच आता आमदार महेंद्र थोरवे यांनीदेखील उडी घेतली असून, आपणही दळवींच्या खांद्याला खांदा लावून कार्यक्रम करू, असा इशारा दिला आहे. दरम्यान त्यामुळे गोगावलेंच्या ताज्या मिश्किल वक्तव्याने महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com