Land Controversy : ‘तो मंत्री कोण? हे फडणवीसांनीच सांगावं', राऊतांच्या आरोपांनंतर ठाकरेंचा कोकणातील एकमेव आमदारही आक्रमक

Bhaskar Jadhav On Sindhudurg Land Controversy : तळकोकणातील शेत जमिनी परप्रांतीय लोकांना विकल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपानंतर आता कोकणात वाद सुरू झाला आहे.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडमार्ग या तालुक्यातील 900 कोटींची जमीन परप्रांतीय लोकांना विकल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला होता. तसेच बंगळुरु, दिल्ली आणि हैदराबादच्या धनिकांना बेकायदेशीर मार्गाने त्या जमिनी विकण्यात आल्या असून या व्यवहारात महायुती सरकारमधील कोकणातील एक मंत्री सहभागी असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्रातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचा नवीन सामना सुरू झाला आहे.

आता या मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी जमीन देण्यासाठी दलाली करणारा मंत्री कोण हे मुख्यमंत्री फडणवीस यांनीच स्वतः समोर येऊन महाराष्ट्राला सांगावं असे आवाहन केले आहे. तसेच फडणवीस असे नाव जाहीर न करता त्या मंत्र्याला पाठीशी घालतील पण त्याच नाव सांगणार नाहीत असा देखील दावा त्यांनी केला आहे.

भास्कर जाधव यांनी, आमचे खासदार राऊत जे आहेत त्यांची आज मुलाकत वाचली. ज्यात त्यांनी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील जमिनीचा मुद्दा मांडला असून खूप मोठा असा आरोप केला आहे. येथे बाहेरचे परप्रांतीय लोक येऊन जमिनी विकत घेत आहेत. याचे पुरावे देखील राऊत यांनी दिले आहेत.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचा सरकारवर संताप; बैठकीचा मुद्दा सांगत चांगलेच भडकले

याचवेळी राऊत यांनी त्या जमिनी धनिकांच्या घशात घालण्यासाठी दलाली करण्याचे काम मंत्रिमंडळातीलच एक मंत्री करत आहेत, असं राऊत म्हणत आहेत. यामुळे आता वास्तविक वस्तुस्थिती काय आहे तात्काळ मुख्यमंत्री यांनी समोर येऊन संपूर्ण महाराष्ट्राला सागायला हवी. महत्वाची बाब म्हणजे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील जमिनी अशा पद्धतीने जात आहेत की नाही? गेल्या असतील तर किती गेल्या? त्या कोणी घेतल्या याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी.

तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यावर असे आरोप होत आहेत? तो खरोखरच यात आहे की नाही याची माहिती देखील त्यांनी सांगावी. पण राज्याचे मुख्यमंत्री कदाचित जमिनीबाबत सांगतील पण ते त्या मुंत्र्याला पाठिशी घालतील असा त्यांचा खाक्या आहे, असा दावा देखील भास्कर जाधव यांनी केला आहे.

याचवेळी त्यांनी भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून देखील सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यांनी, नियोजन समितीची बैठक आठ महिन्यांनंतर पार पडली. जी आठ महिन्यानंतर झाली. जी तीन महिन्यातून एकदा व्हायला हवी असा नियम आहे. पण तसे झाले नाही किंवा इतर गोष्टींवर चर्चा झाली नाही. यावर मी सवाल उपस्थित केले हे माझे काम आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : 'महाजन- गोगावलेंना पालकमंत्रीपद का दिलं? भास्कर जाधवांनी कारणचं सांगितलं

दरम्यान निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. त्यांनी आपण विद्यमान आमदार असतानाही एक पैसा निधी दिला नाही. पण मतदार संघातील गुहागरच्या एका माजी आमदाराला चारपट निधी दिला. लोकप्रतिनिधी नसलेल्या माजी आमदाराला चार कोटींचा निधी दिला. पण आपण एकमेव विरोधी आमदार असल्यानेच निधी दिला गेला नाही असा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com