

चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपने चिपळूणातील चौघांची हकालपट्टी केली.
माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह परिमल भोसले, सुधीर पानकर आणि श्रीराम शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
अपक्ष निवडणूक लढवणे व पक्षाच्या विरोधात काम करणे या कारणांवरून ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
Ratnagiri News : पालिकेच्या निवडणुकीचा लागून गेला असून आता समित्यांचे वाटप देखील झाले आहे. दरम्यान आता निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपने कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. पुण्यात एकाच वेळी 69 जणांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आहे. चिपळण पालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षासह चौघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईने आता कोकणातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
चिपळूण पालिकेची दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली. त्यात परिमल भोसले यांनी पक्षाचा आदेश धुडकावून अपक्ष निवडणूक लढवली म्हणून त्यांच्यासह सुधीर पानकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच सुरेखा खेराडे आणि श्रीराम शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. चिपळूण शहराच्या नगराध्यक्ष म्हणून सुरेखा खेराडे यांनी २०१७ पासून पुढील पाच वर्ष काम केले आहे.
भाजपच्या तिकिटावर थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांपैकी त्या होत्या. तसेच भाजपच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून त्यांना मान मिळाला होता. पालिकेत कामकाज करताना त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले होते. उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.
परंतु नुकतेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परिमल भोसले यांना भाजपकडून स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. श्रीराम शिंदे भाजपचे शहर मंडळ अध्यक्ष तर सुधीर पानकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष होते.
मला पक्षातून निलंबित करण्याचा प्रश्न येत नाही. कारण पालिकेच्या निवडणुकीत मला उमेदवारी देण्यात आली नाही तेव्हा मी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आपल्यावर निलंबन किंवा हकालपट्टीची कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- परिमल भोसले, माजी नगरसेवक
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. मात्र पालिका निवडणुकीत त्यानी पक्षाच्या विरोधात काम केले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे.
- सतीश मोरे, जिल्हाध्यक्ष, भाजप उत्तर रत्नागिरी
1. भाजपने कोणत्या कारणावरून कारवाई केली?
पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे कारवाई करण्यात आली.
2. किती जणांची हकालपट्टी झाली?
एकूण चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
3. सुरेखा खेराडे कोण आहेत?
त्या चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा आहेत.
4. परिमल भोसले यांच्यावर कोणती कारवाई झाली?
पक्षाचा आदेश धुडकावून अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले.
5. या निर्णयामुळे काय परिणाम झाले?
चिपळूणमध्ये राजकीय खळबळ उडाली असून पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.