Congress Office Chair Theft Case : काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात चोरी, खुर्च्या चोरल्या; सीसीटीव्हीने बिंग फोडले

Kolhapur Municipal Corporation Congress Office Theft : कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेतील एका चोरीच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य इमारतीत झालेल्या चोरीच्या या घटनेमुळे महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही चोरी पैशांची नव्हे, तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्या कार्यालयातच झाली असल्याचे समोर आले आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातील खुर्च्या चोरीस जाण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. ही चोरी कोण्या चोरट्याने नव्हे, तर कार्यालयातीलच कर्मचाऱ्याने केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

मुख्य इमारतीत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय नवीन केले आहे. त्यासाठी विविध सुविधांसह खुर्च्याही नवीन आणल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विभागीय कार्यालयातील पवडी कामगार असलेला एक जण प्रयत्न करून या कार्यालयात हजर झाला होता.

Kolhapur Municipal Corporation
Municipal Corporation : खासदार, आमदारांना पालिकेच्या 'कारभारा'त इंटरेस्ट; भुमरे, काळे, बंब, दानवेंच्या बैठका, पत्रव्यवहारांनी प्रशासन 'बेजार'

दरम्यान विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासमोर बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्यांपैकी चार खुर्च्या कमी असल्याचे इतर कर्मचाऱ्यांना जाणवले. त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचा शोध घेतला. विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो कर्मचारी खुर्च्या घेऊन जाताना दिसून आला.

Kolhapur Municipal Corporation
Nashik Municipal Corporation : गिरीश महाजनांची नाशिक महापालिका प्रशासनाकडून दिशाभूल? ठेकेदारांना स्टार रेट'देण्याच्या वादाला आता नवे वळण

त्याला बोलावून कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानेही चोरी केल्याचे मान्य करणारा खुलासा दिला. तसेच माफी देण्याची विनंतीही केली असल्याचे समजते. कार्यालयाने आधी त्याला खुर्च्या परत आणण्यास सांगितले. त्यानुसार त्याने सर्व खुर्च्या परत केल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले; पण त्याचा खुलासा मान्य न करता प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाने तयार करून कार्यवाही सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com