BJP MLA Apologize : ‘जैनांची नगरी’ म्हणणारे भाजप आमदाराचा यू-टर्न; मेहतांची जाहीर माफी

BJP MLA Narendra Mehta Apologizes After Controversy : मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून त्यांनी आता आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे.
Bjp Mla Narendra Mehta
Bjp Mla Narendra Mehtasarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP MLA Narendra Mehta Clarification News : मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी असून मिनी रायजस्थान असल्याचा दावा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर नव्या वादाची ठिणगी पडली होती. मनसे, काँग्रेससह मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली होती. तर मेहता यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. या वादानंतर आता मेहता यांनी आपल्या विधानावरून यु टर्न घेतला असून आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगत माफी मागितली आहे. तसेच मेहता यांनी स्पष्टीकरण देताना हा राजकीय कार्यक्रम नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.

ठाण्यात दादा गुरुदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जैन समाजाच्या विशेष कार्यक्रमात मेहता यांनी मीरा-भाईंदर मीरा-भाईंदर जैनांची नगरी असून हे शहर मिनी राजस्थान असल्याचा दावा केला होता. तसेच महापौरांसह नगरसेवकांचा आकडा सांगत हराचा आमदार जैन, महापौर जैन आणि तब्बल नऊ नगरसेवकही जैन असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले असून भाजप विरूद्ध विरोधक असा संघर्ष सुरू झाला आहे.

दरम्यान मेहता यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, हा राजकीय कार्यक्रम नव्हता असे म्हणत आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Bjp Mla Narendra Mehta
Narendra Mehta : ‘जैनांची नगरी, मिनी राजस्थान’ भाजप आमदाराच्या वक्तव्यावरून नवा संघर्ष? मनसे-काँग्रेस आक्रमक; मराठी एकीकरण समितीची आगपाखड

त्यांनी आपल्या या व्हिडिओत, ठाण्यात जैन समाजाच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात आला होता. तेथे आमच्या जैन समाजाच्या गुरूंनी जैन समाजातील धार्मिक-सामाजिक काम करणाऱ्यांना सत्कार केला होता. त्यावेळी मला देखील पुरस्कार देण्यात आला. तो राजकीय नाही तर जैन समाजाचा कार्यक्रम होता. जेथे मी समाजाला संबोधित केलं. यावेळी मी येथील समाजाला बोलत होतो. माझा कोणाला लहान मोठं असं बोलण्याचा अर्थ नव्हता. यामुळे आपल्या वक्तव्यामुळे कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.

याचवेळी त्यांनी याआधी देखील आपण अनेकदा मीरा-भाईंदर हे सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचं शहर असून ते आगरी-कोळींचे असल्याचे म्हटलं आहे. याच आगरी-कोळींच्या गावातून या शहराची निर्मिती झाल्याचे म्हटलं आहे. तर या शहराच्या विकासात सगळ्याचं वाटा आहे. यामुळे कोणाची तुलना कोणाशी करणे, कोणाची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी म्हटलं आहे. मेहतांनी आपल्या वक्तव्यातून कोणताही वेगळा अर्थ काढू नये असे आव्हान करत तो कार्यक्रम धार्मिक होता असेही पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Bjp Mla Narendra Mehta
MLA Narendra Mehta : भाजप आमदाराकडून पैशांची मागणी, कार्यकर्त्याचा खळबळजनक आरोप; ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा शिंदेंच्या मंत्र्याचा दावा

दरम्यान मेहता यांनी त्यांच्या शाळेतील कांदा-लसूणवरून उसळलेल्या वादावर देखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी शाळेने हे बंधन घातले नव्हते तर याबाबत आवाहन केले होते. ते ही विद्यार्थ्यांनी डबे शेअर करू नयेत, अशी विनंती पालकांनी केल्यानंतर. मी महाराष्ट्रात राहत असून मला त्याचा अभिमान असल्याचेही मेहतांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com