Narendra Mehta : ‘जैनांची नगरी, मिनी राजस्थान’ भाजप आमदाराच्या वक्तव्यावरून नवा संघर्ष? मनसे-काँग्रेस आक्रमक; मराठी एकीकरण समितीची आगपाखड

BJP MLA Narendra Mehta Vs Congress-MNS Clash : मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता असून त्याच्या विधानामुळे वाद सुरू झाला आहे.
BJP MLA Narendra Mehta
BJP MLA Narendra MehtaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News : मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. काहीच दिवसांपूर्वी ते शाळेत कांदा-लसूण बंदीच्या वादग्रस्त नियमामुळे चर्चेत आले होते. यानंतर 'शाही' वाढदिवसामुळे देखील त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आता पुन्हा एकदा आमदार मेहता त्यांच्या दाव्यामुळे वादात सापडले असून त्यांच्यावर मराठी एकीकरण समितीसह मनसेकडून आगपाखड सुरू झाली आहे. मेहता यांनी मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी असून मिनी राजस्थान असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

ठाण्यात दादा गुरुदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जैन समाजाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेहता यांनी मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी असल्याचा दावा केली. तसेच हे शहर मिनी राजस्थान असल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर शहराचा आमदार जैन, महापौर जैन आणि तब्बल नऊ नगरसेवकही जैन असल्याचा दाखला देत महापौरांसह नगरसेवकांचा आकडा सांगितला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता नवा संघर्ष सुरू झाला असून मनसे-काँग्रेस आक्रमक झाली मराठी एकीकरण समितीने आगपाखड केली आहे.

गुरुदेव जेव्हा महाराष्ट्रभर अनवाणी पायांनी चालतात तेव्हा त्यांचे भाजू नये यासाठी पांढऱ्या पट्ट्या मारतो. तसेच मीरा-भाईंदरमध्ये देखील पांढरपट्टा मारण्यात आले होते. त्याच्या राजकारण करण्यात आले. मात्र तेथे कोणताही विरोध होऊ दिला नाही, असा दावा त्यांनी करत आपण स्थानिक जैन समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

BJP MLA Narendra Mehta
MLA Narendra Mehta : भाजप आमदाराकडून पैशांची मागणी, कार्यकर्त्याचा खळबळजनक आरोप; ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा शिंदेंच्या मंत्र्याचा दावा

मी ज्या विभागातून निवडून आलो आहे. त्या विभागात सर्व जातीचे लोक राहतात, आणि मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करत असतो. पण मला आपल्या समाजावर अभिमान आणि गौरव देखील आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की माझा जन्म जैन समाजात झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये जेव्हा जेव्हा जैन समाजाचा विषय तो तेव्हा आम्ही तटस्थ भूमिकेने त्यांच्यासाठी उभे राहतो, असेही त्यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाची ठिणगी पडली असून यावर मनसे विभाग अध्यक्ष सचिन पोपळे यांनी पलटवार केला आहे. ‘मिरा-भाईंदर ही आगरी-कोळी आणि मराठी बांधवांची भूमी आहे, वाद वाढवण्याचे उद्योग बंद करा’ असा इशारा दिला आहे. स्वतःच्या खाजगी व्यवसायात सर्रास दारू विक्री चालते, तिथे कोणताही धर्म किंवा नियम आडवा येत नाही;

मात्र चिमुकल्या मुलांच्या शाळेत आल्यावर अचानक धर्माचे नियम कसे आठवतात, अशी मेहता यांच्यावर टीका केली आहे. तर काँग्रेसने मेहतांवर भाषिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करत मेहता जाणूनबुजून मराठी माणसाला डिवचत असल्याच आरोप काँग्रेस युवा जिल्हा अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी केला आहे.

मराठी एकीकरण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी देखील मेहता यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मेहता यांनी जैन समाजाबाबत केलेल्या वक्तव्यांसह शाळांमधील खानपान बंदी, मराठीविरोधातील मोर्चे आणि शहरातील मांसाहार बंदीचा उल्लेख करत देशमुख यांनी मेहतांवर आरोप केले आहेत.

BJP MLA Narendra Mehta
BJP Narendra Mehta Vs MNS : भाजपच्या नरेंद्र मेहतांच्या शाळेत कांदा-लसूण बंदी, क्लबमध्ये मात्र ‘चमचमीत’ पदार्थ; मनसेचा हल्लाबोल

सत्तेच्या गुर्मीत वागणाऱ्या आमदारावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सर्व का सहन करत आहेत, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तर मेहता यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांना आमदारकीवरून हटवावे, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com