टायगर अभी जिंदा है! नितेश राणेंना जामीन मिळताच पहिले फटाके शिवसेना शाखेसमोर

भाजपचे आमदार नितेश राणे यांना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Nitesh Rane
Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळेे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राणेंना जामीन मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे. कार्यकर्त्यांनी पहिले फटाके कणकवलीतील शिवसेना शाखेसमोर वाजवून मोठा जल्लोष साजरा केला. (Nitesh Rane News)

नितेश राणेंच्या जामिनावर आज सुनावणी सुरू असतानाच भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारी केली होती. राणेंना जामीन मंजूर होताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला. कार्यकर्त्यांनी थेट कणकवलीत शिवसेना शाखेसमोरच फटाके फोडले. कणकवलीतील नरडवे नाका येथील शिवसेना शाखेसमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत फटाके वाजवले. दरम्यान, नितेश राणे कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात दाखल आहेत. तेथेही जमून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. टायगर अभी जिंदा है, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (Nitesh Rane Gets Bail)

Nitesh Rane
नितेश राणेंना जामीन मंजूर झाला अन् निलेश राणे म्हणाले...

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काल (ता.8) जिल्हा न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. पण न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राणेंचा 30 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला आहे. सरकार पक्षाकडून जामीन अर्ज फेटाळण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. अखेर राणेंना जामीन मंजूर झाला आहे.

Nitesh Rane
देशमुखांनी वसुली सांगितली का? चांदीवाल समितीसमोर वाझेने मारली पलटी

काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा प्रकार घडला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी हल्ला झाला होता. परब हे दुचाकीवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांना मागून धडक दिली होती. यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर दोघांनी परब यांच्यावर टोकदार हत्याराने छातीवर वार केले होते. यात परब गंभीर जखमी झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com